१. खोलीत हिमालयाप्रमाणे थंडावा जाणवणे
‘एकदा मी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ ज्या खोलीत सेवा करतात, त्या खोलीमध्ये बसले होते. त्या वेळी ‘मी हिमालयामध्ये बसले आहे कि काय ?’, असे मला वाटत होते. तेव्हा मला खोलीत पुष्कळ थंडावा जाणवत होता. ‘खोलीत वातानुकूलन यंत्र (ए.सी.) लावले आहे कि काय ?’, असे मला वाटले; परंतु तेथे वातानुकून यंत्र लावले नव्हते.
२. ‘खोलीमध्ये पुष्कळ प्रकाश असून ती मोठी झाली आहे’, असे मला जाणवत होते.
३. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची त्वचा मऊ आणि इतकी पारदर्शक दिसत होती की, ‘त्या त्वचेतून प्रकाश बाहेर येत आहे’, असे मला दिसत होते.
४. त्यांचे नेत्र मध्येच परम पूज्यांसारखे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारखे) आणि मध्येच देवीसारखे दिसत होते.
५. त्या वेळी मला वाटले, ‘भगवंत जे दृश्य दाखवत आहे’, हे दृश्य अनुभवत राहूया. डोळ्यांची उघडझाप न करता श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याकडे पहातच राहूया.’
६. मी खोलीमध्ये दृष्टी टाकली, तेव्हा सगळीकडेच प्रकाशाचा एक मंद झोत येतांना दिसला. तो मंद प्रकाश खोलीत शांतपणे येऊन गोल फिरत होता.
७. ‘आता याच ठिकाणी थांबूया. कुठेच जायला नको’, अशी माझ्या मनाची स्थिती झाली होती.’
– (पू.) सौ. संगीता विष्णुपंत जाधव, ठाणे सेवाकेंद्र (१७.१२.२०२२)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |