१. देहली सेवाकेंद्राच्या परिसरात आलेले एक फुलपाखरू साधिकेने तिच्या हातात घेतल्यावर बराच वेळ शांतपणे बसून रहाणे
‘१६.५.२०२३ या दिवशी दुपारी ४ वाजण्याच्या जवळपास देहली सेवाकेंद्राच्या परिसरात हिरव्या रंगाचे एक फुलपाखरू आले होते. ते बराच वेळ भूमीवरच बसून होते. ते पाहून मला असे वाटले, ‘त्याला उडण्यासाठी काहीतरी त्रास होत असल्याने ते उडू शकत नाही.’ मी त्या फुलपाखराला पाहिल्यानंतर त्याला हलकेच माझ्या हातात घेण्याचा प्रयत्न केला असता ते पटकन माझ्या हातावर आले. मी लगेच त्याच्यावर दुसरा हात पोकळी करून झाकला. मी ते फुलपाखरू सद़्गुरु डॉ. पिंगळेकाका आणि सेवाकेंद्रातील साधकांना दाखवले. तोपर्यंत ते फुलपाखरू माझ्या हातावरून मुळीच हलले नाही आणि अगदी शांतपणे बसले होते. मी त्याला दुसर्या हातावर घेण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी त्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करूनही ते शांतच बसले होते. त्याला पाहून आम्हा सर्वांना पुष्कळ आनंद झाला.
२. निराळा रंग असलेल्या फुलपाखराच्या माध्यमातून कुण्या योगीपुरुषाने येऊन साधकांना चैतन्य प्रदान केल्याचे सद़्गुरु डॉ. पिंगळेकाका यांनी सांगणे
त्या फुलपाखराचा रंग एकदमच वेगळा होता. अशा रंगाचे फुलपाखरू मी यापूर्वी कधीच पाहिले नव्हते. सेवाकेंद्राच्या ध्यानमंदिरात ज्या रंगाचे वस्त्र घातले होते, त्याच रंगाचे ते फुलपाखरू होते. सद़्गुरु डॉ. पिंगळेकाका यांनी सांगितले, ‘‘फुलपाखराच्या माध्यमातून कुणी योगीपुरुष येऊन आम्हा सर्वांना चैतन्य प्रदान करून गेले आहेत.’’
३. फुलपाखरू आल्यानंतर साधिकेची ग्लानी दूर होऊन तिला उत्साह वाटू लागणे
त्या दिवशी सकाळपासून मला पुष्कळ ग्लानी येत होती. ते फुलपाखरू येऊन बसले. तेव्हापासून माझी ग्लानी दूर झाली आणि मला पुष्कळ उत्साह अन् आनंद वाटू लागला.
ते फुलपाखरू सर्वांना दाखवून झाल्यानंतर मी त्या फुलपाखराला सेवाकेंद्राच्या बाहेरील परिसरात परत घेऊन गेले. मी त्याला तुळशीजवळ सोडण्याचा प्रयत्न केला असता, ते फुलपाखरू पटकन हवेत उडून गेले. आधी मला असे वाटत होते, ‘कदाचित् त्याला दुखापत झाल्यामुळे उडता येणार नाही’; परंतु नंतर ते अगदी चांगल्या प्रकारे उडून गेले.’
– कु. मनीषा माहुर, देहली सेवाकेंद्र, देहली. (२१.५.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |