‘ऑनलाईन गेम’च्‍या विरोधात नाशिक येथे अनोखे आंदोलन !

आंदोलनाच्‍या माध्‍यमातून भीक स्‍वरूपात मिळालेले पैसे अजय देवगणला पाठवणार

नाशिक, २३ जुलै (वार्ता.) – ‘ऑनलाईन गेम’मुळे सध्‍याच्‍या पिढीची अतोनात हानी होत आहे. त्‍यामुळे येथील एका व्‍यक्‍तीने ‘ऑनलाईन गेम’च्‍या विरोधात चळवळ चालू केली आहे. अभिनेता अजय देवगण हे या गेमचे विज्ञापन करत असल्‍याने संबंधित व्‍यक्‍ती स्‍वत:च्‍या दुचाकीवर ‘अजय देवगण के लिए भीक मांगो आंदोलन’ असे लिहून ध्‍वनीक्षेपक यंत्रणेद्वारे समाजात जनजागृती करत आहे. सध्‍या या व्‍यक्‍तीचा आंदोलन करतांनाचा ‘व्‍हिडिओ’ सामाजिक प्रसारमाध्‍यमांत मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे.

‘देवाने खेळाडू, तसेच अभिनेते यांना पुष्‍कळ धन दिलेले असूनही ते अशा खेळाचे विज्ञापन करून आमच्‍या पिढीला दूषित करण्‍याचा प्रयत्न करत आहेत. त्‍यासाठी या आंदोलनाच्‍या माध्‍यमातून भीक मागून ती भीक अभिनेता अजय देवगणला पाठवण्‍यात येणार आहे, तसेच त्‍याला विनंती करणार आहे की, तुम्‍हाला पुन्‍हा पैशांची आवश्‍यकता भासल्‍यास मी भीक मागेन; पण तुम्‍ही असे विज्ञापन करू नका.’