जॉन्सन अँड जॉन्सन पावडरमुळे कर्करोग झाल्याचे निदान !
वॉशिंग्टन – जॉन्सन अँड जॉन्सन पावडरमुळे कर्करोग झालेल्या पीडित व्यक्तीला १५४ कोटी रुपये हानीभरपाई देण्याचा आदेश ओकलंड न्यायालयाने नुकताच कंपनीला दिला. जॉन्सन अँड जॉन्सन पावडरमुळे कॅलिफोर्नियायातील एका व्यक्तीला कर्करोग झाल्याविषयी कंपनीला ओकलंडमधील ‘डिफॉल्ट स्टेट कोर्ट’ने दोषी ठरवले. न्यायालयाने निकालात म्हटले आहे की, अँथनी हर्नांडेझ वॅलाडेझ (वय २४ वर्षे) यांना जॉन्सन अँड जॉन्सन पावडरमुळे अतीदुर्मिळ असा ‘मेसोथेलियामा’ कर्करोग झाल्याचे निदान झाले आहे. ‘मेसोथेलियामा’ हा शरिरातील अवयवांच्या पृष्ठभागावर निर्माण होतो. सामन्यतः अॅसबेस्टॉस खनिजाच्या संपर्कात आल्यावर हा कर्करोग होतो. वॅलाडेझ यांनी लहानपणापासून जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीचा टॅल्कम पावडरचा वापर केल्याने त्यांना कर्करोग झाल्याचे अँथनी हर्नांडेझ यांनी म्हटले होते. जॉन्सन अँड जॉन्सन उत्पादनांविषयी यापूर्वी अनेक प्रकरणे समोर आली आहेत ज्यात कंपनीला हानीभरपाई द्यावी लागली आहे.
जॉनसन एंड जॉनसन को देना होगा जुर्माना #JohnsonBabyPowder #WorldNews https://t.co/aoYXlcu6W7
— ABP News (@ABPNews) July 19, 2023
जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या अधिकार्यांनी सांगितले की, कंपनीची बेबी पावडर विशेष पांढर्या बाटल्यांमध्ये विकली जाते. त्यामुळे त्यात कधीही ‘एस्बेस्टस’ नसतो. हे सुरक्षित आहे आणि कर्करोग होऊ शकत नाही.
संपादकीय भूमिकाआरोग्यासाठी हानीकारक असलेल्या अशा विदेशी उत्पादनांवर भारत सरकारने तात्काळ बंदी घालणे आवश्यक ! |