‘गोपिकांना श्रीकृष्णाने नग्न केले. नग्न केले, ही अगदी खरी गोष्ट आहे; परंतु चित्रांमध्ये जे दाखवतात अथवा ‘पंडे’ जे समजावतात ते ‘जड’ बुद्धीवाल्यांसाठी आहे. खर्या ‘मी’ वर ५ आवरणे आहेत : १. अन्नमय कोष, २. प्राणमय कोष, ३. मनोमय कोष, ४. विज्ञानमय कोष, ५. आनंदमय कोष.
या ५ कोषांच्या आत खर्या तत्त्वरूपात आपण आहोत, तर गोपिकांचे हे पाचही कोष श्रीकृष्णाच्या बासरीने, दृष्टीने, सान्निध्याने, सत्संगाने हटले होते; म्हणून गोपिका झाल्या होत्या नग्न !…म्हणजेच शरिराचा ‘मी’, प्राणांचा ‘मी’मनाचा ‘मी’, बुद्धीचा ‘मी’, चित्ताचा ‘मी’ ही सर्व आवरणे दूर झाली होती.
(साभार : ‘ऋषी प्रसाद’, अंक ३५३)