जो विषवत् परिणाम देतो, जो बंधनाचे कारण आहे. त्याचे नाव आहे विषय ! जोपर्यंत तुम्ही आपल्या हृदयात विषयाप्रती प्रीती आणि आसक्ती ठेवाल, तोपर्यंत तुमच्या डोक्यात तणाव राहील, हृदयात ताण राहील आणि तुमच्या जीवनात सुख-शांती अन् आनंदाचा अभाव राहील. जेव्हा मनाला विषयांपासून हटवून जेथून आनंद येतो त्या परमात्म्यात लावाल, तेव्हा सर्व तणाव, अशांती दूर होईल आणि शाश्वत आनंदाची प्राप्ती होईल.
(साभार : ‘लोक कल्याण सेतू’, अंक २, वर्ष २०२१)