सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘ब्रह्मोत्सवा’च्या वेळी आलेल्या अनुभूती

१. ब्रह्मोत्सवापूर्वी आलेल्या अनुभूती

सौ. नम्रता शास्त्री

अ. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ८१ वा जन्मोत्सव होणार आहे’, हे ऐकल्यावर मला अत्यानंद झाला. त्या वेळी ‘माझा देह हलका होऊन हवेत तरंगत आहे’, असे मला जाणवले.

आ. ‘संपूर्ण ब्रह्मांड आनंदलहरींनी वेढले गेले आहे आणि आनंदाने डोलत आहे’, असे मला जाणवले.

इ. ‘गुरुदेवांचे दर्शन होणार; म्हणून देहाच्या कणाकणात आनंद भरला आहे’, असे मला जाणवले.

२. ब्रह्मोत्सव पहातांना आलेल्या अनुभूती !

अ. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ रथात बसले होते. तो रथ जसजसा पुढे सरकू लागला, तसतशा मला आनंदाच्या लहरी जाणवू लागल्या. माझा भाव पुष्कळ जागृत झाला आणि माझ्या मनातून गुरुदेवांचा जयजयकार चालू झाला.

आ. ‘झेंडा आणि टाळ घेऊन मीही या दिव्य रथोत्सवात नाचत आहे’, असे मला जाणवले.

इ. मला ‘दिव्य प्रकाश’ जाणवत होता आणि ‘दिव्य नाद’ ऐकू येत होता. त्यामुळे ‘मी विष्णुलोकात आहे’, असे मला जाणवत होते.

ई. गुरुदेवांच्या मुखकमलावरचा वात्सल्यभाव पाहून मला गहिवरून येत होते. ‘हा रथोत्सव संपूच नये ’, असे मला वाटत होते.

उ. ‘सर्व देवता, ऋषीमुनी, यक्ष आणि किन्नर पुष्पवृष्टी करत आहेत’, असे मला जाणवत होते.

ऊ. ‘केवळ गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेमुळेच हा सोहळा पहायला मिळाला’, या विचाराने माझा कृतज्ञताभाव पुष्कळ दाटून आला.

उ. ‘गोविंदा गोविंदा’, असे श्री. विनायक शानभाग यांच्या समवेत म्हणत असतांना, तो नाद ब्रह्मांडात जात आहे आणि मी अन् सर्व साधक यांच्यामध्ये पुष्कळ भक्तीभाव जागृत झाला आहे’, असे मला जाणवत होते.

३. ब्रह्मोत्सवानंतर आलेल्या अनुभूती

अ. ‘सर्व साधकांच्या चेहर्‍यावर पुष्कळ आनंद ओसंडून वहात असून सर्व जण भावावस्थेत आहेत’, असे मला जाणवले.

आ. माझा देह, मन आणि चित्त यांमध्ये सतत गुरुदेवांचा जयजयकार चालू होता.

इ. सोहळ्यानंतर दिव्यरथाचे दर्शन घेतांना ‘एक दिव्य शक्ती शरिरात पसरत आहे’, असे मला जाणवले.

ई. रथ पाहून डोळे दिपून गेले. ‘रथामध्ये गुरुदेव आणि सद्गुरुद्वयी नसतांनाही त्यांचे अस्तित्व जाणवून वात्सल्यलहरी येत असल्याचे जाणवत होते.’

– सौ. नम्रता शास्त्री (आध्यात्मिक पातळी ६९ टक्के, वय ७२ वर्षे), फाेंडा, गोवा. (१२.५.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक