उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. हेरंब महेश गोजगेकर हा या पिढीतील एक आहे !
(‘वर्ष २०२० मध्ये कु. हेरंब महेश गोजगेकर याची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के होती आणि आता वर्ष २०२३ मध्येही त्याची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के आहे.’ – संकलक)
सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
१. ‘मी अध्यात्मप्रसाराच्या सेवेला जातांना हेरंब माझ्या समवेत असतो. मी त्याला एखादी सेवा सांगितली, तर तो ती सेवा आवडीने करतो.
२. संपर्क करून ग्रंथ वितरण झाल्यावर हेरंबने कृतज्ञता व्यक्त करणे आणि आईलाही कृतज्ञता व्यक्त करण्यास सांगणे : सनातनचे ७५ वे समष्टी संत पू. रमानंद गौडा यांनी आम्हाला ग्रंथ वितरणाची सेवा दिली होती. त्या वेळी आम्ही ज्यांना संपर्क करत होतो, ते आमच्याकडून ग्रंथ विकत घ्यायचे. तेव्हा हेरंब कृतज्ञता व्यक्त करायचा आणि मलाही कृतज्ञता व्यक्त करायला सांगत असे.
३. चुकांविषयी गांभीर्य असणे
हेरंब त्याच्याकडून शाळेत असतांना झालेल्या चुका घरी आल्यावर मला सांगतो आणि त्या चुका मला लिहायला सांगतो. ‘त्या चुकांवर स्वयंसूचना कशी सिद्ध करायची ?’ ते हेरंब मला विचारून घेतो.
४. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले सूक्ष्मातून घरी येतात; म्हणून शांत वाटते’, असे साधिकेला सांगणे
आमच्या घरी कु. कल्पना मेलगे या साधिका आल्या होत्या. त्या म्हणाल्या, ‘‘ताई, तुमच्या घरात पुष्कळ शांत वाटते आणि इथेच बसून रहावेसे वाटते.’’ त्या वेळी हेरंब म्हणाला, ‘‘शांतता आमच्यामुळे नाही, तर प.पू. गुरुदेव घरी येतात; म्हणून शांत वाटते.’’ तेव्हा कल्पना म्हणाली, ‘‘हेरंब किती शांत आणि समजूतदार आहे ! अशी मुले प्रत्येक कुटुंबात जन्माला यावीत.’’
– सौ. सविता महेश गोजगेकर (हेरंबची आई ), बसुर्ते, बेळगाव.
(४. ६. २०२२)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |