भक्‍ताची ‘भ’ ची बाराखडी

श्रीमती रजनी साळुंके

भ – ‘भक्‍तीमय झालेला भगवंताचा भक्‍त

भा – भावसागरात सतत डुंबणारा

भि – भिस्‍त सारी भगवंतावर असणारा, ईश्‍वरापासून भिन्‍न नसलेला

भी – भीक भावभक्‍तीची भगवंताकडे मागणारा

भु – भुकेला भावाचा

भू – भूतलावरील चराचरात देवाचे अस्‍तित्‍व पहाणारा

भे – भेटीसाठी भगवंताच्‍या तळमळणारा, प्राणीमात्रात भेदभाव न मानणारा

भै – भैरवीतील आर्तता भगवंताच्‍या नामस्‍मरणात अनुभवणारा

भो – भोवतालचे भान विसरून भगवंत-भक्‍तीत रमलेला

भौ – भौतिकाची आसक्‍ती नसलेला

भं – अभंगांतून सतत भगवंताची स्‍तुती करण्‍याची आवड असलेला

अशा भक्‍ताला भगवंत सदैव आपल्‍या हृदयात ठेवतो.’

– श्रीमती रजनी साळुंके, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.४.२०२३)