पुणे – बंदी घातलेल्या ‘इस्लामिक स्टेट’ या आतंकवादी संघटनेत तरुणांची भरती करण्यासाठी जुबेर नूर महंमद शेख हा सामाजिक माध्यमातून तरुणांचा बुद्धीभेद करत असे. जुबेर याला राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) पुण्यातील कोंढवा परिसरातून कह्यात घेतले आहे. विविध राज्यांतील २० जण त्याच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. जुबेर शेख हा मूळचा सातारा जिल्ह्यातील कराड येथील रहिवासी असून तोे संगणक अभियंता आहे.
NIA busts ISIS module, arrests former IT engineer from Kondhwa https://t.co/xIYt8sezeB
— Steve Stalinsky PhD (@SteveStalinsky) July 5, 2023
हिंजवडीतील एका नामांकित माहिती तंत्रज्ञान आस्थापनात तो कामाला आहे. वार्षिक १५ लाख रुपयांचे ‘पॅकेज’ असूनही तो ‘इन्स्टाग्राम’, ‘फेसबुक’, ‘व्हॉट्सअॅप’ आदी सामाजिक माध्यमांवर ‘अबू नुसैबा’ या नावाने वावरत होता. ‘आपला धर्म कशा प्रकारे श्रेष्ठ आणि इतर धर्म कशा पद्धतीने हीन आहेत ?’, याविषयीची माहिती तो अल्पसंख्य समाजातील तरुणांना देत असे, तसेच तो चिथावणीखोर माहिती प्रसारित करत असे. एन्.आय.ए.ने त्याच्या घरी टाकलेल्या धाडीत इस्लामिक स्टेटशी संबंधित महत्त्वपूर्ण कागदपत्रे, साहित्य, ‘लॅपटॉप’, ‘मेमरी कार्ड’, भ्रमणभाष आदी साहित्य जप्त केले आहे.
संपादकीय भूमिका
|