मुंबई, ८ जुलै (वार्ता.) – आर्थिक अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांना इच्छा असूनही परदेशात उच्च शिक्षण घेता येत नाही, तसेच परदेशातील विद्यार्थ्यांनाही भारतात उच्च शिक्षण घेता येत नाही; म्हणून परदेशातील ज्या विद्यापिठांचे विद्यार्थी आपल्याकडे येतील, त्या विद्यापिठांमध्ये त्याच शिक्षण शुल्कात आपले विद्यार्थी शिक्षण घेतील, यासाठी विद्यापिठांनी परदेशी विद्यापिठांसमवेत सामंजस्य करार करावेत,
असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी चर्चगेट येथील श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एस्.एन्.डी.टी.) महिला विद्यापिठाच्या १०८ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित सोहळ्यात केले.
एसएनडीटी महिला विद्यापीठाचा १०८ वा स्थापना दिवस समारोह राज्यपाल तथा विद्यापीठांचे कुलपती रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठाच्या पाटकर सभागृहात संपन्न झाला. pic.twitter.com/gdGJjYybn9
— Governor of Maharashtra (@maha_governor) July 8, 2023
या वेळी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचीही उपस्थिती होती.