टोमॅटोच्या दराने उच्चांक गाठल्याचा परिणाम
हासन (कर्नाटक) – देशात टोमॅटोेच्या दराने उच्चांक गाठला आहे. १०० ते १५० रुपये प्रतिकिलो या दराने टोमॅटो विकले जात आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील हासन जिल्ह्यातील गोनी सोमनहल्ली गावातील एका शेतकरी महिलेने तिच्या शेतातील अडीच लाख रुपयांचे टोमॅटाची चोरी करण्यात आल्याचा आरोप केला. या महिलेने तिच्या २ एकर भूमीवर टोमॅटो उगवले होते. ते काढून ती ते बेंगळुरूच्या बाजारात विकणार होती; मात्र त्यापूर्वीच त्या टोमॅटोंची चोरी करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांत तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.
https://t.co/vUbtHnVlZa || ना सोना ना चांदी… यहां चोरों ने खेत पर डाला डाका, उड़ा दिए 2.5 लाख रुपये के टमाटर #TomatoesStolen #Karnataka #Tomatoes #TomatoPrice pic.twitter.com/AyEKelCCAc
— Dainik Jagran (@JagranNews) July 6, 2023
संपादकीय भूमिकाकाँग्रेसच्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा ! आता चोरी होण्याची एवढीच गोष्ट राहिली होती ! |