ईश्‍वराप्रती खरी कृतज्ञता कोणती ?

ज्‍या ईश्‍वरामुळे प्रत्‍येक श्‍वास आपल्‍या जीवनात येतो, त्‍याच्‍याविषयी केवळ शाब्‍द़िक कृतज्ञता व्‍यक्‍त करण्‍याने पूर्ण लाभ होत नाही. ‘आपण ईश्‍वराविषयी कृतज्ञ आहोत’, हे आपल्‍या वर्तनातूनही दिसायला हवे. ईश्‍वराचे नाम सदैव मुखात ठेवणे, ईश्‍वराच्‍या लेकरांचा म्‍हणजे सकलजनांचा उद्धार व्‍हावा, म्‍हणजेच त्‍यांना ईश्‍वरप्राप्‍ती व्‍हावी, यासाठी त्‍यांना अध्‍यात्‍मज्ञान देणे, हे जर आपण अविरत केले, तर ती ईश्‍वराप्रती खरी कृतज्ञता ठरेल. (संदर्भ : सनातनचा ग्रंथ – ‘अहं निर्मूलनासाठी साधना’)