पुणे – संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेतील शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्यावर २ सहस्र पानांचे आरोपपत्र प्रविष्ट केले आहे. या वेळी कुरुलकर यांची पॉलीग्राफ चाचणी आणि व्हाइस लेयर चाचणी घेण्याच्या मागणीवर सरकारी अन् बचाव या दोन्ही पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाला. कुरुलकर यांच्याकडून अन्वेषणात अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने पॉलीग्राफ आणि व्हाइस लेयर चाचण्यांची मागणी केल्याचा युक्तिवाद सरकारी अधिवक्त्यांनी केला. या आरोपपत्रात अनेक गंभीर गोष्टींचा उलगडा असून कुरुलकरांच्या भ्रमणसंगणकामध्ये अनेक आक्षेपार्ह आणि धक्कादायक माहिती सापडल्याचे म्हटले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ७ जुलै या दिवशी होणार आहे.