अल्लाच्या कृपेने राज्यात काँग्रेस सरकार सत्तेवर आले आहे !

कर्नाटकचे काँग्रेस सरकारमधील गृहमंत्री परमेश्‍वर यांचे संतापजनक विधान !

कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्‍वर

तुमकुरू (कर्नाटक) – अल्लाच्या कृपेने राज्यात काँग्रेस सरकार आले आहे. तुमच्या आशीर्वादाने मी गृहमंत्री झालो आहे. देवाचा आशीर्वाद नसता, तर मी आमदार झालो नसतो, असे विधान राज्याचे गृहमंत्री जी. परमेश्‍वर यांनी केले. बकरी ईदनिमित्त कोरटगेरे गावातील ईदगाह मैदानात झालेल्या सामूहिक नमाजपठणात सहभागी होऊन त्यांनी मुसलमानांना शुभेच्छा दिल्या. त्या वेळी मुसलमानांनी परमेश्‍वर यांना गोल टोपी घालून ‘मुख्यमंत्री पद लाभू दे’, अशी शुभेच्छा व्यक्त केली.

(चित्रावर क्लिक करा)

परमेश्‍वर पुढे म्हणाले की, बकरी ईद हा सण त्याग आणि बलीदान यांचे प्रतीक आहे. ‘अल्ला वेगवेगळ्या रीतीने परीक्षा घेतो’, असे म्हणतात. रमझानच्या काळात मी येथेच आलो होतो. तेव्हा निवडणुक असल्याने मी मते मागण्यासाठी आलो होतो. तुम्ही मला विजयी केले. एकीकडे मागच्या सरकारमुळे मुसलमानांना चिंता होती. त्यांच्यात भीतीचे वातावरण होते. ते सर्व सोडून मुसलमानांनी काँग्रेसला मतदान केले. काँग्रेस हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे; म्हणून मुसलमान आमच्यासमेवत आले. त्यांच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. आमच्यावर मोठे दायित्व आहे. विकासासह शांततादेखील राखायची आहे. गृहमंत्री म्हणून मी शांतता राखण्याचे काम करीन. द्वेष करणार नाही.

संपादकीय भूमिका

  • कर्नाटकातील ज्या बहुसंख्य हिंदूंनी काँग्रेसला मतदान केले, त्यांना हे विधान मान्य आहे का ?
  • मुसलमान मंत्री कधी ‘भगवान शंकर, विष्णु आदी हिंदूंच्या देवतांच्या कृपेने सरकार सत्तेवर आले’, असे म्हणेल का ?