वर्धा येथील कु. अर्चना निखार यांना वर्ष २०२२ मध्‍ये होत असलेला मानेचा त्रास परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या कृपेमुळे उणावून गुरुपौर्णिमेची सेवा करता येणे

१. आधुनिक वैद्यांनी सांगितल्‍याप्रमाणे औषधे घेऊन आणि व्‍यायाम करूनही मानेचा त्रास न्‍यून न होणे

कु. अर्चना निखार

‘मला वर्ष २०२२ मध्‍ये एप्रिल मासापासून मानेचा त्रास चालू झाला. मला उजव्‍या बाजूला मान वळवता येत नव्‍हती. मी हा त्रास आधुनिक वैद्यांना दाखवला. त्‍यांनी मला औषधे दिली, तसेच व्‍यायामाचे प्रकार करायला सांगितले. मी हे सर्व करत होते, तरी माझा मानेचा त्रास न्‍यून होत नव्‍हता.

२. गुरुपौर्णिमा विशेषांकातील विज्ञापन संरचना आणि विशेष स्‍मरणिकेची संरचना करण्‍याची सेवा मिळणे; परंतु संगणकावर सेवा करतांना मान वळवता न येणे

याच कालावधीत दोन जिल्‍ह्यांचे गुरुपौर्णिमा विशेषांक निघणार होते. तेव्‍हा मला या गुरुपौर्णिमा विशेषांकातील विज्ञापन संरचना आणि विशेष स्‍मरणिकेची संरचना करण्‍याची सेवा मिळाली होती. मला संगणकावर सेवा करतांना उजव्‍या बाजूला मान वळवता येत नव्‍हती. त्‍या वेळी ‘माझ्‍या मानेवर सिमेंटचा अवजड खांब (पोल) ठेवला आहे’, असे मला वाटत होते. ‘माझा खांदा ते कान इथपर्यंतचा मानेचा पूर्ण भाग कडक झाला आहे’, असे मला वाटत होते. त्‍यामुळे मला मान हलवता येत नव्‍हती.

३. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या कृपेमुळे मानेचा त्रास हळूहळू न्‍यून होणे

मी संगणकावर विज्ञापनाची सेवा करत होते. तेव्‍हा मी संगणकाच्‍या उजव्‍या बाजूला परात्‍पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्र असलेले दैनिक ‘सनातन प्रभात’ ठेवले होते. मी सेवा करतांना आरंभी त्‍या छायाचित्राकडे बघण्‍यासाठी मान वळवण्‍याचा प्रयत्न केला. नंतर सेवा करण्‍यासाठी मान वळवण्‍याचा प्रयत्न केला. तेव्‍हा केवळ परात्‍पर गुरुमाऊलींच्‍या कृपेमुळे माझा मानेचा त्रास हळूहळू न्‍यून होत गेला. त्‍यामुळे मला विज्ञापन संरचनेची सेवा करता आली.

‘गुरुमाऊली, तुमच्‍या कृपेमुळे मला ही सेवा करण्‍याची संधी मिळाली आणि तुम्‍हीच ती सेवा माझ्‍याकडून करून घेतलीत, त्‍यासाठी मी तुमच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– कु. अर्चना निखार, वर्धा (१९.११.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक