भाजप युवा मोर्चाचे नेते प्रवीण नेट्टारू यांच्या हत्येचे प्रकरण
बेंगळुरू (कर्नाटक) – भाजप युवा मोर्चाचे नेते प्रवीण नेट्टारू यांच्या हत्येच्या प्रकरणातील पॉप्युुलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पी.एफ्.आय.च्या) ३ कार्यकर्त्यांच्या घरांची झडती राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून (एन्.आय.ए.कडून) घेण्यात आली. गेल्या वर्षी २२ जुलैला नेट्टारू यांची हत्या करण्यात आली होती.
BJP कार्यकर्ता की हत्या का मामला, NIA ने फरार संदिग्धों के घरों की तलाशी ली#BJP #NIAhttps://t.co/MWSws4qbnb
— Zee News (@ZeeNews) June 28, 2023
कोडागू जिल्ह्यातील अब्दुल नासिर आणि अब्दुल रहमान, तर दक्षिण कन्नड जिल्ह्यात नौशाद यांच्या घरांची झडती घेण्यात आली. येथून काही साहित्य जप्त करण्यात आले. या हत्येच्या प्रकरणी २० जणांना आरोपी बनवण्यात आले आहे. त्यांच्यावर आरोपपत्रही प्रविष्ट करण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, नेट्टारू यांची हत्या हा वर्ष २०४७ मध्ये भारताला इस्लामी देश बनवण्याच्या षड्यंत्राचाच एक भाग होता. त्यासाठी आरोपींना प्रशिक्षण देण्यात आले होते.