कर्नाटकच्या ऐतिहासिक होयसळ साम्राज्याशी संबंधित होयसळ गावात ७५ वर्षांनी बससेवा चालू !

चिक्कमगळुरू (कर्नाटक) – दक्षिण भारतात ३०० हून अधिक वर्षे राज्य करणार्‍या चिक्कमगळुरू जिल्ह्यातील प्रसिद्ध होयसळ साम्राज्याशी संबंधित होयसळ गावामध्ये स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनी बससेवा चालू झाली आहे. होयसळ राजवंशाचे माहेरघर असलेल्या या गावात बससेवा चालू करण्यासाठी स्थानिकांना अनेक दशके आंदोलने करणे आणि निवेदने देणे, या माध्यमातून लढा द्यावा लागला. या गावात २०० हून अधिक कुटुंबे रहातात. हे गाव आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. या गावातील लोकांना बससाठी ५ कि.मी. चालत जावे लागत होते.

संपादकीय भूमिका 

जनतेविषयी असंवेदनशील असणार्‍या स्वातंत्र्यानंतर आतापर्यंतच्या सरकारांना हे लज्जास्पद !