सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची बहुतांश छायाचित्रे जिवंत झाल्‍याचे जाणवणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘मी रामनाथी आश्रमातील ध्‍यानमंदिरात नामजपाला बसले होते. त्‍या वेळी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या छायाचित्राकडे पाहून नामजप करत होते. त्‍यांच्‍या छायाचित्राकडे पाहून नामजप करतांना ‘ते छायाचित्रातून बाहेर येऊन आता बोलतील कि काय ?’, असे मला वाटत होते. त्‍यांच्‍या छायाचित्रात इतका जिवंतपणा जाणवत होता. त्‍यानंतर मी काही दिवसांनी मिरज आश्रमात सेवेसाठी गेले असतांना तेथील ध्‍यानमंदिरात नामजप करतांनाही मला अशीच अनुभूती आली. त्‍यानंतर आता सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे कुठेही असलेले (उदा. भ्रमणभाषवर, संगणकाच्‍या पडद्यावर असलेले) छायाचित्र पाहिले, तर ‘ते त्‍या छायाचित्रातून बाहेर येऊन बोलतील कि काय ?’, असे मला जाणवते.’

– सौ. श्रद्धा, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.५.२०२३)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक