१. ‘यांच्यात धर्माभिमान, संघटन कौशल्य, नेतृत्व, प्रेमभाव असे विविध गुण असून ते नेहमी प्रसन्न आणि उत्साही असतात.
२. ते राष्ट्र, धर्म आणि हिंदूंच्या रक्षणासाठी दिवस-रात्र झोकून देऊन काम करतात. त्यामुळे त्यांना देवाचे साहाय्य पण मिळते आणि अनेक हिंदूंना त्यांचा आधार वाटतो अन् हिंदू त्यांच्याशी जोडले जातात.’ – श्री. राम होनप आणि श्री. निषाद देशमुख
३. ‘त्यांना हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांविषयी प्रचंड चीड असल्याने ते प्रखरतेने हिंदुत्वाचे रक्षण करण्यासाठी सतत कृतीशील असतात.’ – कु. मधुरा भोसले
४. ‘त्यांच्यात पुष्कळ क्षात्रवृत्ती आहे; परंतु ते विविध प्रसंगी संयमाने वागतात.’ – श्री. राम होनप
– श्री. राम होनप, कु. मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) आणि श्री. निषाद देशमुख (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.६.२०२३)