जगात प्रतिदिन होतात साडेतेरा लाख रस्ते अपघात !

जपानी चालक सर्वांत सुरक्षित, तर भारत १७ व्या स्थानावर !

सिडनी (ऑस्ट्रेलिया) – जगात प्रतिदिन रस्ते अपघातांमध्ये साधारण ३ सहस्त्र ७०० लोक जीव गमावतात. तसेच प्रतिदिन सरासरी साडेतेरा लाख रस्ते अपघात होतात. यांतर्गत सर्वांत सुरक्षित रस्ते आणि चालक कोणत्या देशात आहेत, याचा ऑस्ट्रेलियातील आस्थापन ‘कम्पेअर मार्केट’ने अभ्यास केला. यासाठी जगभरातील चालकांची आणि अपघातांची माहितीचा आधार घेण्यात आला. यानुसार जपानमधील चालक सर्वांत कुशल आणि सुरक्षित आहेत. यानंतर ब्रिटन, नेदरलँड्स, जर्मनी, कॅनडा आणि स्पेन यांचा क्रमांक लोगतो. २० देशांत केलेल्या या अभ्यासात सुरक्षित चालकांच्या संदर्भात भारत १७ व्या स्थानी आहे.

‘कम्पेयर मार्केट ऑस्ट्रेलिया’चे महाव्यवस्थापक एड्रियन टेलर म्हणाले की, गाडी चांगल्या प्रकारे चालवण्याची क्षमता महिला किंवा पुरुषांत नाही, तर ती व्यक्तीगत पात्रता आणि अनुभव यांवर अवलंबून आहे.