हिंदु संघटनांना कलंकित करणे, हा काँग्रेसचा इतिहास ! – नरेंद्र सुर्वे, प्रवक्‍ते, हिंदु जनजागृती समिती

बजरंग दल आणि ‘पॉप्‍युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पी.एफ्.आय.) यांची तुलनाच होऊ शकत नाही; कारण बजरंग दल ही राष्‍ट्रभक्‍त संघटना, तर पी.एफ्.आय. एक राष्‍ट्रविरोधी अन् आतंकवादी संघटना आहे. हिंदु संघटनांना कलंकित करणे, हा काँग्रेसचा इतिहास राहिला आहे. फक्‍त बजरंग दलच नव्‍हे, तर यापूर्वी राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघ, सनातन संस्‍था, हिंदु जनजागृती समिती आदी अनेक हिंदु संघटनांवर काँग्रेसने बंदी आणण्‍याचा प्रयत्न केला आहे; मात्र जिहादी संघटनावर बंदी आणावी, यासाठी काँग्रेसने काहीच केले नाही. हिंदू समाज आता जागृत होत असून तो सर्व हिंदु संघटनांसह उभा रहाणार आहे.