विविधांगी गुणवैशिष्ट्ये असलेली दैवी बालके !

प्रेमळ आणि श्रीकृष्ण अन् प.पू. डॉक्टर यांच्याप्रती भाव असलेली ६८ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. प्रार्थना महेश पाठक !

कु. प्रार्थना पाठक

१. सतत हसतमुख आणि आनंदी

प्रार्थना सतत हसतमुख आणि आनंदी असते. एखादे मूल रडत असल्यास ती लगेच गाणे म्हणून किंवा श्रीकृष्णाच्या गोष्टी सांगून त्याला हसवते.

२. स्वच्छतेची आवड

प्रार्थनाला स्वच्छ रहायला आवडते. प्रतिदिन अंघोळीच्या पूर्वी प्रसाधनगृह आणि अंघोळीचा साबणही ती स्वच्छ करायला सांगते.

३. सर्वांची काळजी घेणे

प्रार्थनाला तिच्या अवतीभोवती असणार्‍या सर्वांची काळजी घ्यायला आवडते. ती लहान मुले आणि वयस्कर यांची अत्यंत प्रेमाने काळजी घेते.

४. पालटलेल्या परिस्थितीतही स्थिर रहाणे

परिस्थितीत पालट झाला, तरी प्रार्थना स्थिर असते. अलीकडेच (वर्ष २०१६च्या आरंभी) मी सनातनच्या रामनाथी येथील आश्रमात गेले होते. तेथे मला माझ्या आध्यात्मिक त्रासाच्या निवारणासाठी ५ घंटे नामजपादी उपाय करायला सांगितले होते. तेव्हा प्रार्थना माझ्यासमवेत प्रतिदिन ५ घंट्यांपर्यंत उपायांच्या खोलीत बसत असे.

५. ती स्वतःकडून होणार्‍या चुका लगेच स्वीकारते आणि त्या चुकांसाठी ती नियमितपणे प्रायश्चित्त घेते.

६. श्रीकृष्ण आणि प.पू. डॉक्टर यांच्याप्रती प्रार्थनाच्या मनात पुष्कळ भाव आहे. ती खेळतांना त्यांच्यासाठी स्वयंपाक करून त्यांना वाढते.

– सौ. मनीषा महेश पाठक, अमेरिका. (२४.५.२०१६) (आताच्या पू. (सौ.) मनीषा महेश पाठक, पुणे)

७. ‘शाळा हे मंदिर आहे’, असा भाव ठेवणारी चि. प्रार्थना !

शाळेत गेल्यानंतर वर्गात प्रवेश करतांना ती नमस्कार करूनच वर्गात प्रवेश करते. हे जेव्हा ती सांगायची, तेव्हा त्यातून ‘शाळा हे मंदिर आहे’, असा तिचा भाव दिसून यायचा.

– सौ. सारिका आय्या, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.२.२०१६)

८. समजूतदारपणा

प्रार्थनाची आई आजारी असल्याने ती झोपून असते आणि वडील सेवेत असतात. ती स्वतःचे सर्व आवरते. तिचा साहित्याचा खण, कपाट आणि खेळणी ती व्यवस्थित आवरून ठेवते. तिच्या या सर्व कृती पाहून ‘ती लहान आहे’, असे वाटत नाही. तेव्हा ती समजूतदार असल्याचा अनुभव येतो. – कु. वैभवी भोवर, पुणे (१.३.२०२०) (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के)

९. समंजस

अ. प्रार्थना १ – २ वर्षांची असतांना मनीषाताई तिला साधकांच्या पाळणाघरात ठेवत असे. तिचे त्याविषयी कोणतेच गार्‍हाणे नसे. पाळणाघराची वेळ संपल्यावर तिला न्यायला एखादी साधिका जायची आणि त्या तिला काही घंटे स्वत:च्या घरी ठेवायच्या. मनीषाताई सेवेत असल्याने बर्‍याच वेळा असे करावे लागायचे. तेव्हा प्रार्थना सहजतेने साधिकांसह त्यांच्या घरी जात असे. तिने ‘मला आईनेच न्यायला यायला हवे’, असा हट्ट कधी केला नाही.’ – सौ. राजश्री खोल्लम, पुणे

आ. ‘तिने कधी कोणत्याही गोष्टीसाठी हट्ट केला नाही. अन्य लहान मुलांप्रमाणे ती चंचल आणि हट्टी नाही. सौ. मनीषाताई आणि श्री. महेशदादा रंगपंचमीनिमित्त खडकवासला मोहिमेच्या सेवेत व्यस्त असतांना ‘तिच्या वाढदिवसाला आई-बाबांनी काहीतरी करावे’, असे तिला जराही वाटले नाही. ‘ती भावनांच्या पलीकडे भावाच्या स्तरावर गेली आहे’, असे जाणवते. – सौ. स्नेहल पाटील (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के)    

शांत, मितभाषी आणि चुकांविषयी खंत वाटणारी ६६ टक्के आध्यात्मिक पातळीची दैवी बालिका कु. श्रीया अनिरुद्ध राजंदेकर हिची गुणवैशिष्ट्ये ! 

कु. श्रिया राजंदेकर

१.  शांत आणि मितभाषी

‘कु. श्रीयाचा स्वभाव पुष्कळ शांत आणि मितभाषी आहे. कुणाच्या घरी गेल्यावर, तसेच सत्संग किंवा मार्गदर्शन यांसाठी गेल्यावर ती शांतपणे माझ्या जवळ कार्यक्रम संपेपर्यंत बसून असते. घरातसुद्धा ती शांतपणे तिच्या खेळण्यांशी खेळत असते.

२. एकाग्रता

तिच्यामध्ये पुष्कळ एकाग्रता आहे. प्रत्येक कृती ती एकाग्रतेने करते. तिच्यातील एकाग्रतेमुळे तिला वर्गात शिकवलेला विषय लगेच पाठ झालेला असतो. सद्गुरु स्वातीताईंचे मार्गदर्शन वा सत्संग यांमधील सूत्रे, मी किंवा तिच्या बाबांनी सांगितलेल्या गोष्टी इत्यादी सगळे ती लक्षपूर्वक ऐकते.

३. इतरांचा विचार करण्याची वृत्ती

घरी आलेले पाहुणे, तिच्या मैत्रिणी आणि घरातील सर्वजण यांचा ती इतक्या लहान वयातही पुष्कळ विचार करते. कुणाला काय हवे किंवा कुणाला काय आवडते, हे तिला न सांगताच कळते. आलेल्या पाहुण्यांना पाणी देणे, रात्री झोपण्यासाठी सिद्धता (तयारी) करणे, हे सर्व ती स्वतःहून करते. मी रुग्णाईत असल्यास ती जेवायला जे काही असेल, ते आनंदाने जेवते. मला ‘हवे-नको’ ते पहाणे, औषध देणे इत्यादी सर्व ती प्रेमाने करते.

४. निर्जीव खेळण्यांप्रती भाव

श्रीया तिच्या सर्व खेळण्यांची प्रेमाने काळजी घेते. खेळणी हळुवारपणे आणि काळजीपूर्वक हाताळते. तिच्या हातून एखादे खेळणे पडले, तर ती ते लगेच उचलून त्याची क्षमा मागते आणि ‘तुला लागले का?’, असे विचारते. विशेष म्हणजे ती असतांना तिची सर्व खेळणी आनंदी आणि उजळ दिसतात. आम्ही गावाला जाणार असलो, तर श्रीया सर्व खेळण्यांना जवळ घेऊन ‘मी गावाला जाऊन लवकर येते’, असे सांगते.

५. चुकांविषयी खंत वाटणे

श्रीया तिच्याकडून होणार्‍या चुका प्रामाणिकपणे सांगते. ती मला आणि तिच्या बाबांनाही आमचे कुठे चुकले ? हे सांगते. तिच्या सांगण्यात प्रेम असते. ‘‘देवबाप्पाला चुका केलेल्या आवडत नाहीत. त्याला प्रार्थना कर’’, असे ती सांगते. तिच्याकडून झालेल्या चुकांसाठी आम्ही तिला जी शिक्षा किंवा प्रायश्चित सांगतो, ते ती शांतपणे स्वीकारते आणि ते पूर्णही करते.

 – सौ. मानसी अनिरुद्ध राजंदेकर, पुणे (२७.४.२०१६) (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के)

दैवी बालकांत आढळणारा निरागस प्रेमभाव !

कु. मधुरा भोसले

दैवी गुण असलेल्या बालकांमध्ये आसुरी शक्ती आणि वाईट कृत्ये करणारे यांविषयी प्रचंड चीड असली, तरी साधक, संत, प.पू. डॉक्टर आणि प्राणीमात्र यांविषयी त्यांना पुष्कळ प्रेम अन् आत्मीयता वाटते. या बालकांचा प्रेमभाव अतिशय शुद्ध असतो. त्यांच्या प्रेमळ कृती आणि गोड बोलणे यांतून त्यांची निरागसता, निरपेक्षता अन् निर्मळता अनुभवण्यास मिळते.

आश्रमात कुणाला बरे नसेल, तर त्यांची आपुलकीने विचारपूस करणे आणि प्रेमाने काळजी घेणे, गाय किंवा अश्व या सात्त्विक प्राण्यांना प्रेमाने कुरवाळणे, गायीला प्रेमाने अन्नपदार्थ भरवणे, फुलपाखराला अलगद उचलून घेणे आणि हाताळणे, पाण्यातील माशांना चुरमुरे खाण्यासाठी देणे, वार्‍याने हलणारी झाडे पाहून ‘झाडांना आनंद होऊन ती डोलत आहेत’, असे वाटणे, ‘झाडे अन् पशूपक्षी यांनाही तहान-भूक लागत असेल आणि त्यांनाही ऊन, पाऊस अन् थंडी यांचा त्रास होत असेल’, असे वाटून त्यांची काळजी वाटत असणे, अशा सहजतेने होणार्‍या अनेक कृतींतून त्यांच्या हृदयातील प्रेमभाव व्यक्त होत असतो.

या बाळांचे निरागस प्रेम मिळाल्याने प्राणीमात्रही धन्य होतात आणि त्यांना प्रेमाने प्रतिसाद देतात, उदा. फुलपाखरू त्यांच्याजवळ पुष्कळ वेळ बसणे, त्यांना पहाण्यासाठी तलावाच्या तळाशी असणारे कासव पाण्यातून वर येऊन डोकावणे, गायीने बाळांना प्रेमाने चाटणे, बाळांनी भरवलेले अन्न प्राण्यांनी चटकन ग्रहण करणे इत्यादी.

– कु. मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.११.२०१४) 

सुसंस्कारित मुलांचा आदर्श दिनक्रम कसा हवा ?   


 १. सकाळी उठल्यानंतर भूमीदेवतेला प्रार्थना करावी. आवरल्यावर देवाला आणि वडीलधार्‍यांना नमस्कार करावा. अंघोळ करून शाळेत जावे. शाळेत जातांना आईला सांगून आणि देवाला प्रार्थना करूनच बाहेर पडावे.

२. शाळेत जातांना मनात कुलदेवतेचा नामजप करावा. शाळेत गेल्यावर तेथील वास्तुदेवता, स्थानदेवता, तसेच श्री सरस्वती आणि श्री गणेश या देवतांना प्रार्थना करावी.

३. शाळा सुटल्यावर तेथील वास्तुदेवता, स्थानदेवता, तसेच श्री सरस्वती आणि श्री गणेश यांना कृतज्ञता व्यक्त करावी.

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.