चाकण (पुणे) परिसरातील जागृत हिंदुत्‍वनिष्‍ठ कार्यकर्त्‍यांमुळे ‘लव्‍ह जिहाद’चे प्रकरण उघड !

प्रतीकात्मक छायाचित्र

चाकण (जिल्‍हा पुणे) – कबीर गुप्‍ता असे हिंदु नाव सांगून सफर आदिब या मुसलमान तरुणाने हिंदु तरुणीला प्रेमाच्‍या जाळ्‍यात ओढले. (प्रेम करण्‍यासाठी धर्म का लपवावा लागतो, हे निधर्मीवादी सांगतील का ? – संपादक) २ जून या दिवशी येथील संग्रामदुर्ग येथे जागृत हिंदुत्‍वनिष्‍ठ कार्यकर्त्‍यांनी ‘लव्‍ह जिहाद’चे हे प्रकरण उघडकीस आणले आणि त्‍याला चोप दिला. त्‍यानंतर त्‍याने स्‍वतःचे नाव सफरुद्दीन उपाख्‍य सफर आदिब असे सांगितले. कार्यकर्त्‍यांनी त्‍याला ओळखपत्र मागितल्‍यावर त्‍यावर सफर आदिब असे नाव दिसून आले.

संपादकीय भूमिका

‘लव्‍ह जिहाद’चे प्रकरण उघड करणार्‍या हिंदुत्‍वनिष्‍ठ कार्यकर्त्‍यांचे अभिनंदन ! 

‘लव्‍ह जिहाद’च्‍या प्रतिदिन घडणार्‍या घटना पहाता आतातरी देशभरात ‘लव्‍ह जिहाद विरोधी कायदा’ होणार का ?