धुळे येथील टिपू सुलतान चौकातील अनधिकृत चबुतरा पाडला !

धुळे – शहरातील वडजाई रस्‍त्‍यावर ‘टिपू सुलतान चौक’ असे नामकरण केलेल्‍या चौकात बांधण्‍यात आलेला चबुतरा अखेर सहठेकेदाराने ९ जूनच्‍या पहाटेपासून काढण्‍यास प्रारंभ केला आहे. हा चबुतरा महापालिकेची अनुमती न घेता बांधण्‍यात आला होता. ८ जून या दिवशी जिल्‍हा आणि पोलीस प्रशासन यांच्‍या बैठकांमध्‍ये हा चबुतरा अनधिकृत असल्‍याचे निष्‍पन्‍न झाल्‍याने संबंधित सहठेकेदाराला हा चबुतरा काढून घेण्‍याचे आदेश देण्‍यात आले. परिसरात पोलिसांचा बंदोबस्‍त तैनात करण्‍यात आला आहे.

या चौकाचे सुशोभिकरण करून यात चबुतरा बांधण्‍यात आला होता. काही दिवसांपूर्वी या चौकाला ‘टिपू सुलतान’ असेे नामकरणही करण्‍यात आले होते. या प्रकारामुळे हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटना येथे आक्रमक झाल्‍या. ‘हा चबुतरा येथील आमदार फारुख शाह यांच्‍या सहकार्याने उभारण्‍यात आला असून त्‍यांच्‍या विरोधात गुन्‍हा नोंद करावा, तसेच हा चबुतरा तोडण्‍यात यावा’, अशी मागणी भाजपने पोलिसांना दिलेल्‍या निवेदनाद्वारे केली होती.

हिंदुत्‍वनिष्‍ठांनी चबुतरा तोडण्‍याची मागणी लावून धरली !  

साक्री रस्‍ता येथील मंदिरातील मूर्तीची विटंबना झाल्‍यानंतर हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांनी १० जून या दिवशी मोर्चा काढण्‍याची चेतावणी देऊन यात वडजाई रस्‍त्‍यावरील हा चबुतरा तोडण्‍याची मागणी लावून धरली. ८ जून या दिवशी महापालिकेच्‍या प्रवेशद्वारावरून महापौर प्रतिभाताई चौधरी, स्‍थायी समितीचे माजी सभापती सुनील बैसाणे यांच्‍यासह कार्यकर्त्‍यांनी निदर्शने करत या चबुतर्‍याच्‍या संदर्भात आयुक्‍त दैविदास टेकाळे यांच्‍यावर गंभीर आरोप केले. ‘त्‍यांच्‍या सहकार्यानेच हा चबुतरा उभारला गेला आहे’, असा आरोप केला. या चौकाचे टिपू सुलतान नामकरण करतांना महापालिकेच्‍या कोणत्‍याही सभेत ठराव केला गेला नाही; मात्र तरीही अनधिकृत चौकाचे नामकरण केले आहे, असा आरोप या वेळी आंदोलन करणार्‍या कार्यकर्त्‍यांनी केला.

बांधकाम विभागानेही चबुतरा उभारण्‍यासाठी निधी दिला नाही !

जिल्‍हाधिकारी जलज शर्मा यांच्‍या दालनामध्‍ये ८ जूनच्‍या सायंकाळी एक बैठक झाली. यात पोलीस प्रशासनासह महानगरपालिका आणि बांधकाम विभागातील अधिकारी उपस्‍थित होते. या बैठकीतील चर्चेत महानगरपालिकेकडून हा चबुतरा उभारण्‍यासाठी, तसेच चौक नामकरणासाठी कोणतीही अनुमती किंवा निधी दिला गेला नसल्‍याचे स्‍पष्‍ट झाले.

संपादकीय भूमिका

महापालिकेची अनुमती न घेता टिपू सुलतान चौकात चबुतरा बांधलाच कसा जातो ? याकडे महापालिकेच्‍या अधिकार्‍यांनी आंधळेपणाची भूमिका घेतल्‍याचे दिसून येते. त्‍यामुळे या अधिकार्‍यांवर प्रथम कठोर कारवाई करायला हवी !

चौकाचे अनधिकृतरित्‍या नामकरण झाल्‍यावर लगेच त्‍यावरही हा आक्षेप घेतला गेला असता, तर पुढे अनधिकृत चबुतरा बांधण्‍याचे धर्मांधांचे धाडस झाले नसते !

टिपू सुलतान चौकाचे नामकरण करून अनधिकृत चबुतरा उभारणार्‍या अंतर्गत शत्रूंना हिंदूंनी संघटनाद्वारे प्रत्‍युत्तर द्यावे !