तुकोबारायांच्या पालखी रथाला मुसलमान कारागीर देत आहेत चकाकी !

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी १० जूनला पंढरपूरकडे प्रस्थान करणार !

तुकोबारायांच्या पालखी रथाला चकाकी देताना मुसलमान कारागीर

पुणे – जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी १० जून या दिवशी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. त्यापूर्वी रथाला चकाकी देण्याचे काम करण्यात येत आहे. ‘घनश्याम गोल्ड’ या आस्थापनाकडून प्रतीवर्षी तुकोबांची पालखी आणि रथ यांना चकाकी देण्याचे काम करण्यात येते. या आस्थापनातील मुसलमान कारागीर रथाला आणि पालखीला चकाकी देण्याचे काम प्रतिवर्षी करतात. गेल्या ७ वर्षांपासून हे काम अविरतपणे चालू असल्याची माहिती कारागिरांनी दिली आहे. (पालखीला हात लावण्यासाठी शेकडो कि.मी. अंतर चालून वारकरी येतात, सामान्य भाविक जिवाचा आटापीटा करतात. खरेतर सांप्रदायिक परंपरेनुसार रथावर सांप्रदायिक टोपी घातल्याविना जाता येत नाही, येथे मुसलमान कारागिरांनींही ती आचारसंहिता पाळावी असेच हिंदूंना  वाटते ! – संपादक) काही हिंदुत्वनिष्ठांनी तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या कामासाठी मुसलमान कारागिरांनी काम करण्याला फेसबुक पोस्ट करून आक्षेप घेतला आहे. ‘गोमांस भक्षण करण्यार्‍यांकडून पालखीचे पावित्र्य कसे टिकून रहाणार ?’, असा प्रश्‍न उपस्थित करून ‘देहू संस्थानला हे कसे समजत नाही ?’, असा प्रश्‍न विचारला आहे.

लाखो वारकर्‍यांचे देहू हे श्रद्धास्थान आहे. प्रतिवर्षी लाखोच्या संख्येने आषाढी वारीच्या निमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून वारकरी देहूत येतात. यावर्षी मोठ्या संख्येने वारकरी उपस्थित रहातील, असे सांगण्यात येत आहे.

संपादकीय भूमिका

सर्वधर्मसमभावाच्या अतिरेकामुळे अशा कृती होतात. मुसलमानांच्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये हिंदु कारागिरांनी सजावट केल्याचे वगैरे आपण ऐकले आहे का ?