श्री. श्रीरंग कुलकर्णी हे सनातन संस्थेच्या साधिका आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती पिंगळे यांचे धाकटे बंधू असून ते जन्मतःच विकलांग आहेत. ते ऑगस्ट २०२१ पासून रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात राहून सेवा करत आहेत. या कालावधीत साधकांना त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. सौ. प्रतिमा शिंपी
१ अ. चामुंडा यागाच्या वेळी पूर्ण सभागृह साधकांनी भरल्यामुळे श्रीरंगदादांना बसायला जागा नसणे, तेव्हा कसलाही त्रागा न करता ते सभागृहाच्या पायरीवर शांतपणे बसणे : ‘आश्रमात चामुंडा याग चालू होता. तेव्हा यागासाठी श्रीरंगदादा सभागृहात बसायला येत असत. एक दिवस सभागृह पूर्ण भरले होते. त्यांना बसण्यासाठी जागा नव्हती. तेव्हा श्रीरंगदादा सभागृहाच्या बाहेरच्या पायरीवर शांतपणे बसले होते. श्रीरंगदादांकडे बघून ‘ते देवाच्या अनुसंधानात आहे’, असे जाणवले. त्यांची एकाग्रता बघून माझीही भावजागृती झाली. ‘त्यांची लवकरच आध्यात्मिक उन्नती होईल’, असे जाणवले.’
२. सौ. अनुपमा जोशी (वर्ष २०२२ मधील आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ७० वर्षे)
२ अ. बुद्धीमान असणे : ‘श्री. श्रीरंग यांना पाहिल्यावर मला वाटले, ‘अन्यांप्रमाणे यांची बुद्धी अल्प असावी; पण एकदा आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती पिंगळेताई माझ्या समोरील बाकावर महाप्रसादासाठी बसल्या होत्या. त्या वेळी श्रीरंगने एका कागदावर दोनच ओळी लिहून आणल्या आणि त्यांना दाखवल्या. मी सहज त्या कागदावरील ओळींकडे पाहिले. तेव्हा त्यांनी अचूक शब्दांत, सुंदर अक्षरांत आणि व्यवस्थित लिहून विचारणा केली होती. त्यांचे ते अक्षर पाहून मी चकितच झाले. त्यांची वाक्यरचनाही मोजकीच होती; पण त्या दोन वाक्यात पूर्ण भावार्थ दडलेला होता. यावरून ‘ते पुष्कळ बुद्धीमान आहेत’, हे माझ्या लक्षात आले.’
३. सौ. निवेदिता जोशी (वय ५० वर्षे, वर्ष २०२२ मधील आध्यात्मिक पातळी ६१ टक्के)
३ अ. ‘श्रीरंगददा नेहमी हसतमुख असतात.
३ आ. सेवेची तळमळ : त्यांची सेवा करण्याची तळमळ पाहून ‘ते पूर्ण क्षमतेने सेवा करतात’, असे वाटले. त्या वेळी ‘माझी शारीरिक स्थिती चांगली असूनही मी सेवेत कुठे न्यून पडते ?’, हे माझ्या लक्षात आले आणि मला खंत वाटली.
३ इ. सेवाभाव : श्री. श्रीरंग कुलकर्णी सेवा मनापासून आणि एकाग्रतेने करतांना दिसून येतात. ‘सेवा करतांना ते थकले आहेत किंवा कंटाळा आला आहे’, असे त्यांच्या चेहर्यावरून कधीही वाटत नाही.
३ ई. भावजागृती होणे : परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या भावसत्संगात श्रीरंगदादांविषयीची सूत्रे चालू असतांना अनेक भावलहरीचे तरंग त्या ठिकाणी जाणवत होते. त्या सत्संगात उपस्थित अनेक साधकांची भावजागृती झाली.’
४. सौ. प्रार्थना सागर चव्हाण
४ अ. ऐकण्याची वृत्ती : ‘कुठलीही गोष्ट श्री. श्रीरंग यांना विचारली असता ते पूर्ण ऐकून घेऊनच त्याचे नम्रतेने उत्तर देतात.
४ आ. साधकांप्रती भाव : परात्पर गुरु डॉक्टरांना भेटण्यासाठी साधक आतुरतेने वाट बघतात, तसेच श्रीरंगदादा साधकांना भेटण्यासाठी आतुरतेने वाट बघतात. ते प्रत्येक साधकाच्या हृदयमंदिरातील गुरुदेवांना तळमळीने आणि आर्ततेने बघतात. हे त्यांच्यातील उत्कट भावामुळे होते.’
५. श्री. राहुल कुलकर्णी
५ अ. व्यवस्थितपणा : ‘श्रीरंगदादा त्यांचे जेवण झाल्यावर ‘जेवतांना पटलावर काही सांडले आहे का ?’, हे पाहून ते पुसून घेतात.
५ आ. श्रीरंगदादा शरिराने विकलांग असले, तरी त्यांचे मन आणि बुद्धी चांगले अन् सात्त्विक असणे : श्रीरंगदादांची सेवा करण्याची आणि आश्रमात वावरण्याची पद्धत अन् कृती पाहून ‘ते शरिराने विकलांग असले, तरी ते मन आणि बुद्धी यांनी विकलांग नाहीत’, असे मला जाणवते. त्यांचे वागणे हे सर्वांना शिकण्यासारखे आणि आदर्श आहे. त्यांच्या सर्व कृती साधकांनी कृतीत आणल्या, तर ‘साधक गुरुदेवांच्या चरणी लवकर जातील’, असे मला वाटते.
५ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव : त्यांच्या अंतर्मनामध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी पुष्कळ भाव आहे. त्यामुळे ते सेवाही पुष्कळ भावपूर्ण करतात.’
६. सौ. संगीता श्रीकांत चौधरी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा
६ अ. स्वावलंबी : ‘सौ. मधुवंतीकाकू ३ दिवसांसाठी आश्रमातून बाहेर गेल्या होत्या. तेव्हाही श्रीरंगदादा त्यांच्या नियोजनाप्रमाणे नियमित सर्व कृती करत होते.
६ आ. ग्रंथवाचनाची आवड : श्रीरंगदादा ग्रंथांचे नियमित वाचन करतात. त्यातील काही विषयांचा अभ्यास केल्यावर ते त्यातील महत्त्वाच्या भागावर चित्तवेधक आणि रंगीत (हायलाइटरने) पेनने खुणा करतात. त्यांना वाचायला कठीण जाते, तरीही ते वाचन करायचे सोडत नाहीत.’