८ ते १३ जून या काळात धार्मिक कार्यक्रम
सोलापूर – भावसार क्षत्रिय समाज श्री हिंगुलांबिकादेवी देवालयाच्या वतीने ८ ते १३ जून या कालावधीत प्राणप्रतिष्ठापना, शतचंडीयाग यांसमवेत अन्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वेदमूर्ती घनपाठी देविदास हुंडेकरी आणि अन्य घनपाठी ब्रह्मवृंद यांच्या अधिपत्याखाली हे विधी होणार आहेत, अशी माहिती अध्यक्ष श्री. किशोर कटारे यांनी दिली. सोलापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी श्री. विजय पुकाळे, श्री. श्रीकांत अंबुरे हेही उपस्थित होते.
श्री. किशोर कटारे पुढे म्हणाले, ‘‘कर्नाटक येथे (कृष्णकंडीकेमध्ये) वेदोक्त पद्धतीने १६ कलांनी पूर्ण अशी नवी मूर्ती बनवण्यात आली आहे; मात्र तिचे मूळ स्वरूप कायम ठेवण्यात आले आहे. मूर्ती साकारण्यासाठी १६ मास इतका कालावधी लागला आहे, तर देवीचे मंदिर १२५ वर्षांपूर्वी बांधलेले आहे.’’