‘कोव्हिशिल्ड’ आणि ‘सीरम इन्स्टिट्यूट’ यांची अपकीर्ती करणारे लिखाण सामाजिक माध्यमांवरून हटवण्याचा न्यायालयाचा आदेश !

अदर पुनावाला

मुंबई – कोरोनाच्या काळात ‘कोव्हिशिल्ड’ लस, तसेच ही लस सिद्ध करणारी पुणे येथील ‘सीरम इन्स्टिट्यूट’ यांची अपकीर्ती करणारे लिखाण सामाजिक माध्यमांवरून हटण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला. ‘सीरम इन्स्टिट्यूट अ‍ॅण्ड कंपनी’चे मालक अदर पूनावाला यांनी यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. यावर ५ जून या दिवशी न्यायमूर्ती रियाज छागला यांच्यापुढे ही सुनावणी झाली.


योहान टेंग्रा यांची ‘अनार्की फॉर फ्रीडम इंडिया’ ही संस्था, तसेच ‘अंबर कोईरी’ यांची ‘अवेकन इंडिया मूव्हमेंट’ ही संस्था यांनी सामाजिक माध्यमांवर ‘कोविशिल्ड’ लस आणि ‘सीरम इन्स्टिट्यूट’ यांविषयी अपकीर्ती करणारे लिखाण प्रसारित केले होते.

‘कोविशिल्ड’ लसीमुळे अनेकांचा मृत्यू झाल्याचा प्रसार या संस्थांकडून करण्यात आल्याचा आरोप अदर पुनावाला यांनी केला असून या दोन्ही संस्थांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात १०० कोटी रुपयांच्या मानहानीचा दावा केला आहे. हानीभरपाई विषयीचा निर्णय न्यायालयाने प्रलंबित ठेवला आहे.