पंजाब येथे भारत-पाक सीमेवर सैनिकांनी पाडले पाकचे ड्रोन !

२१ कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त !

अमृतसर (पंजाब) – येथील अटारी सीमेजवळ सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी पाकमधून आलेले एक ड्रोन पाडले. या ड्रोनसमवेत पाठवण्यात आलेले २१ कोटी रुपयांचे हेरॉईन हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. यापूर्वी २ आणि ३ जून या दिवशीही सीमेवर ड्रोनद्वारे टाकण्यात आलेले हेरॉईन जप्त करण्यात आले होते. एकूण ८ किलो हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. याची आंतरराष्ट्रीय किंमत कोट्यवधी रुपये आहे.