उत्तरप्रदेशमध्ये सिगारेट पिण्यावरून विद्यार्थी आणि सुरक्षारक्षक यांच्या हाणामारी !

अटक करण्यात आलेले आरोपी

नोएडा (उत्तरप्रदेश) – येथे सिगारेट पिण्यावरून जे.आय.आय.एम्.एस्. (जिम्स) या महाविद्यालयाच्या वसतीगृहातील विद्यार्थी आणि सुरक्षारक्षक यांच्या जोरदार हाणामारी झाली. यात १५ विद्यार्थी घायाळ झाले असून उपचारार्थ त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. ४ जूनला रात्री उशिरा ही घटना घडली.

एक विद्यार्थी सिगारेट पित होता. त्यात तेथील सुरक्षारक्षकाने अडवले. यावरून दोघांमध्ये प्रथमक बाचाबाची आणि नंतर हाणामारी झाली. तेथे अन्यही विद्यार्थी आले. त्यामुळे सुरक्षा रक्षकाने त्याच्या अन्य ५ सहकार्यांना बोलवून घेतले. तेव्हा विद्यार्थी आणि सुरक्षारक्षक यांच्यात जोरदार हाणामारी झाली. या प्रकरणी पोलिसांनी ३३ जणांना कह्यात घेतले आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या विरोधात तक्रारी करण्यात आल्या असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

संपादकीय भूमिका

आतापर्यंतच्या सर्व सरकारांनी सिगारेटवर बंदी न घातल्याचाच हा परिणाम आहे !