महाळुंगे पडवळ (पुणे) येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने ‘द केरल स्टोरी’ चित्रपट दाखवण्यात आला !

‘जय श्रीराम’च्या घोषणा देत ५०० महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

महिला भगिनी, युवती आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

महाळुंगे पडवळ (जिल्हा पुणे), ४ जून (वार्ता.) – येथे ३ जून या दिवशी गावातील महिला भगिनी, युवती आणि ग्रामस्थ यांना ‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट विनामूल्य दाखवण्यात आला. या वेळी गावातील सर्व वाड्या-वस्त्यांवरून महिला युवती आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चित्रपटाचे आयोजन हुतात्मा बाबू गेनू युवा प्रतिष्ठान, बजरंग दल, विश्व हिंदु परिषद यांच्या वतीने करण्यात आले होते, तसेच वाहनांची सोय करून सर्व महिला भगिनींना चित्रपट दाखवण्यासाठी आणण्यात आले आणि घरी परत सोडण्यात आले. याला गावातील काही लोकांनी विरोध करत कार्यक्रम बंद करण्याचा प्रयत्न केला तरीही कार्यकर्त्यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहून चित्रपट दाखवला.

मार्गदर्शन करतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. दिलीप शेटे

या वेळी ५०० महिला उपस्थित होत्या, चित्रपट चालू होण्यापूर्वी सर्व महिलांनी उत्स्फूर्तपणे ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. दिलीप शेटे यांनी ‘लव्ह जिहाद’ याविषयी मार्गदर्शनही केले आणि मंचर येथे घेण्यात येणार्‍या हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनात सहभागी होण्यासाठी आवाहन केले.

चित्रपट पाहून झाल्यावर अनेक महिलांनी प्रतिक्रिया देतांना सांगितले की, तुम्ही योग्यप्रकारे जनजागृती केली. आम्ही येथून पुढे आपल्या पाल्यांच्या विषयी सावधानता बाळगू !