घरफोडी करणार्‍या आणि सिलेंडर चोरणार्‍या टोळीस अटक !

प्रतीकात्मक छायाचित्र

सातारा, १ जून (वार्ता.) – स्‍थानिक गुन्‍हे शाखेच्‍या पथकाने घरफोडीचे ७ गुन्‍हे उघडकीस आणत ४ जणांना अटक केली आहे. त्‍यांच्‍याकडून ६ लाख ३१ सहस्र रुपयांचा मुद्देमाल हस्‍तगत करण्‍यात आला आहे. स्‍थानिक गुन्‍हे शाखेला माहिती मिळाली की, ४ जणांनी सातारा येथील भारत गॅस एजन्‍सीच्‍या गोडाऊनमधून सिलेंडर चोरले आहेत. मिळालेल्‍या माहितीच्‍या अनुषंगाने चौकशी केली असता संशयितांनी भारत गॅस एजन्‍सीमधून ३५ आणि खटाव येथून ४० सिलेंडर चोरले असल्‍याची माहिती दिली. चोरी करणार्‍यांचा कोणत्‍या मोठ्या टोळीशी संबंध आहे का ? याचा तपास पोलीस करत आहेत.