पुजारी मंडळाचे माजी अध्‍यक्ष श्री. किशोर गंगणे ‘समाजभूषण’ पुरस्‍काराने सन्‍मानित !

धाराशिव – श्री तुळजाभवानी मंदिरातील पाळीकर पुजारी मंडळाचे माजी अध्‍यक्ष श्री. किशोर गंगणे यांना मानवाधिकार अ‍ॅक्‍शन फोरम यांच्‍या वतीने सामाजिक कार्याविषयी दिला जाणारा ‘समाजभूषण’ पुरस्‍कार देण्‍यात आला. हा पुरस्‍कार मानवाधिकार अ‍ॅक्‍शन फोरमचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष अधिवक्‍ता शुभम द्विवेदी यांच्‍या हस्‍ते सन्‍मानपत्र, स्‍मृतीचिन्‍ह स्‍वरूपात देण्‍यात आला. या वेळी अधिवक्‍ता कैलास बिसकुटे, कलीम खुटेपड, पैगंबर काझी आदी मान्‍यवर उपस्‍थित होते.

पुजारी मंडळाचे अध्‍यक्ष असतांना श्री. किशोर गंगणे यांनी विविध उपक्रम राबवून पुजार्‍यांसह भाविकांच्‍या सोयीसाठी उपाययोजना केल्‍या, तसेच सामाजिक कार्यातही त्‍यांचा मोठा सहभाग होता. त्‍यांच्‍या या कार्याची नोंद घेऊन त्‍यांना हा पुरस्‍कार देण्‍यात आला. या पुरस्‍काराविषयी सामाजिक संघटना, पुजारी मंडळ, राजकीय पक्ष अशा विविध स्‍तरांतून त्‍यांचे कौतुक होत आहे.