जुनागड (गुजरात) येथील अवैध मजारी आणि दर्गे हटवण्यास मुसलमानांचा विरोध !

  • २ सहस्र मुसलमान रस्त्यावर !

  • १७८ मजारींसह ११ मंदिरांवर कारवाई !

उपरकोट किल्ल्याभोवतीचा परिसर अतिक्रमणमुक्त करण्याच्या मोहिमेविरोधात २ सहस्र मुसलमान रस्त्यावर !

जुनागड (गुजरात) – येथील उपरकोट किल्ल्याभोवतीचा परिसर अतिक्रमणमुक्त करण्याची मोहीम प्रशासनाने चालू केली आहे. यांतर्गत करण्यात येणार्‍या कारवाईत अनेक अवैध मंदिरे, मजारी (पीर किंवा फकीर यांची थडगी) आणि दर्गे पाडण्यात आले आहेत; मात्र स्थानिक मुसलमान याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. ही मोहीम चालू केल्यानंतर २ सहस्र मुसलमानांनी जमून त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला.

जुनागडचा उपरकोट किल्ला

२६ मे २०२३ या दिवशी प्रशासनाने अतिक्रमणे पाडण्याची मोहीम चालू केली. २६ मेच्या मध्यरात्री २ वाजता जुनागडचे नगरसेवक अद्रेमान पंजा, आसिफ सांद, वहाब कुरेशी यांच्यासह अनुमाने २ सहस्र मुसलमान एकत्र आले. यामध्ये स्थानिक मौलवी (इस्लामचे धार्मिक नेते), मुफ्ती (शरीयत कायद्याचे जाणकार) आणि मौलाना (इस्लामी अभ्यासक) यांचा समावेश होता. त्यांनी प्रशासनाची कारवाई रोखण्याचा प्रयत्न केला; मात्र प्रशासनाने पोलिसांच्या उपस्थितीत कारवाई चालूच ठेवली.

१७८ मजारींसह ११ मंदिरांवर कारवाई !

राज्य सरकारने ७० कोटी रुपये खर्चून जुनागडमधील उपरकोट किल्ल्याचे  नूतनीकरण केले आहे. हा किल्ला आता लोकांसाठी खुला करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशासनाने किल्ल्याच्या आजूबाजूचा परिसर अवैध अतिक्रमणापासून मुक्त करण्याची मोहीम हाती घेतली असून यांतर्गत ११ मंदिरे आणि १७८ मजारी पाडण्यात आल्या.

कारवाईच्या विरोधात मुसलमानांकडून न्यायालयात याचिका प्रविष्ट !

उपरकोट येथील अतिक्रमणाच्या विरोधात चालू असलेल्या मोहिमेविषयी मुसलमान गटाने गुजरात उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करून त्यावर तातडीने सुनावणी करण्याची मागणी केली आहे.

संपादकीय भूमिका

मंदिरांवर कारवाई होऊनही हिंदू एका शब्दाने विरोध करत नाहीत, याउलट मजारी आणि दर्गे यांवरील कारवाईच्या विरोधात सहस्रो कायदाद्रोही मुसलमान थेट रस्त्यावर उतरतात ! तरीही पुरो(अधो)गामी नेहमी हिंदूंनाच आक्रमक आणि हिंसक ठरवातात !