‘जमियत उलेमा-ए-हिंद’चे अध्यक्ष सय्यद अर्शद मदनी यांचे फुत्कार !
मुंबई – काँग्रेसने कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत प्रसारित केलेल्या घोषणापत्रात बजरंग दलावर बंदी घालण्याचे आश्वासन दिले आहे. जर हा निर्णय ७० वर्षांपूर्वी घेतला असता, तर आज देश अधोगतीला गेला नसता, असे विधान जमियत उलेमा-ए-हिंद के अध्यक्ष सैयद अरशद मदनी यांनी मुंबई येथे केले.
सैयद अरशद मदनी ने कहा, ‘कांग्रेस पार्टी ने अपने घोषणा पत्र में फ़िरका-परस्त (सांप्रदायिक) की जमात बजरंग दल को बंद करने की बात कही थी. अगर उन्होंने यह फैसला 70 साल पहले लिया होता तो मुल्क बर्बाद न होता.’#bajarangdal #syedarshadmadanihttps://t.co/ayjumfgpJq
— AajTak (@aajtak) May 21, 2023
मदनी पुढे म्हणाले की, काँग्रेसने घोषणापत्रात बंदीचे आश्वासन दिल्याने चूक केली, असेही म्हटले जात आहे. मला वाटते ही चूक नाही, तर चूक सुधारण्याचा प्रयत्न आहे. (काँग्रेसने जिहादी संघटनांवर बंदी घातली नाही, हीच मोठी चूक आहे ! तसेच मुसलमान संघटना, त्यांचे नेते, धर्मगुरू कधीही जिहादी आतंकवाद्यांच्या विरोधात चकार शब्द काढत नाहीत, तसेच त्यांना संघटितपणे विरोध करत नाहीत. उलट जिहादी संघटनांवर बंदी घातली, त्याला विरोध करतात, हे लक्षात घ्या ! – संपादक)
संपादकीय भूमिका
|