जैसलमेर (राजस्थान) येथे पाकिस्तानी निर्वासित हिंदूंची ५० पेक्षा अधिक घरे प्रशासनाने पाडली !

जैसलमेर (राजस्थान) – येथील अमर सागर भागात पाकिस्तानी निर्वासित हिंदू  कुटुंबांची घरे प्रशासनाने बुलडोझरद्वारे पाडली. हे पाकिस्तानी निर्वासित हिंदू बर्‍याच काळापासून येथे रहात होते. जिल्हाधिकारी टीना डाबी यांच्या आदेशानंतर प्रशासनाने ही कारवाई केली. जेव्हा प्रशासन कारवाई करायला आले होते, तेव्हा महिलांनी कडाडून विरोध केला; मात्र कुणाचेही न ऐकता ही घरे पाडण्यात आली. त्यांची ५० पेक्षा अधिक कच्ची घरे पाडण्यात आली आहेत. या कारवाईमुळे १५० पेक्षा अधिक महिला, पुरुष आणि लहान मुले रस्त्यावर आली आहेत. अमर सागर या ठिकाणी जो तलाव आहे त्या तलावाजवळ ही घरे बांधण्यात आली होती.

संपादकीय भूमिका

राजस्थानमधील काँग्रेस सरकार म्हणजे हिंदुद्वेषी पाकिस्तानी राजवट ! केंद्रातील भाजप सरकारने या हिंदूंना साहाय्य करावे, असेच देशभरातील हिंदूंना वाटते !