शिवलिंगाला हानी न पोचू देता त्याचे वैज्ञानिक सर्वेक्षण करता येऊ शकते !

ज्ञानवापी प्रकरणी पुरातत्व विभागाची अलाहाबाद उच्च न्यायालयात माहिती

ज्ञानवापी परिसरात सापडलेले शिवलिंग आणि अलाहाबाद उच्च न्यायालय

वाराणसी (उत्तरप्रदेश) – ज्ञानवापीच्या परिसरात आढळलेल्या शिवलिंगाला कुठल्याही प्रकारची हानी पोचू न देताही त्याचे वैज्ञानिक सर्वेक्षण करता येऊ शकते, अशी माहिती भारतीय पुरातत्व विभागाने अलाहाबाद उच्च न्यायालयात दिली.

या संदर्भात पुरातत्व विभागाने न्यायालयाला सादर केलेल्या अहवालात शिवलिंगाच्या वैज्ञानिक तपासणीच्या संभाव्य परिणामांसह तेथे वैज्ञानिक सर्वेक्षण करण्यासाठी उपलब्ध असलेल्या सर्व पर्यायांचा तपशील मांडला आहे. न्यायालयात पुरातत्व विभागाच्या वतीने बाजू मांडतांना भारताचे अतिरिक्त महाधिवक्ता शशी प्रकाश सिंह आणि मनोज कुमार सिंह म्हणाले की, शिवलिंगाला कुठलीही हानी न पोचवता त्याची वैज्ञानिक तपासणी करण्यासाठी उपयुक्त असणार्‍या पद्धतींचा अवलंब केला पाहिजे अन् न्यायालयानेही त्यास मान्यता दिली पाहिजे, जेणेकरून शिवलिंगाचे खरे वय कळू शकेल. न्यायालयाच्या देखरेखेखाली हे सर्वेक्षण होईल.