डेहराडून (उत्तराखंड) – उत्तराखंड उच्च न्यायालयाने हरिद्वार येथील एका औषध आस्थापनामध्ये काम करणार्या एका २२ वर्षांच्या हिंदु तरुणीला दर्ग्यात जाऊन नमाजपठण करण्याची अनुमती दिली आहे. ही तरुणी मूळची मध्यप्रदेशातील निमच येथील रहाणारी आहे. ती आणि तिच्या मित्राने मिळून ही याचिका प्रविष्ट केली होती. ते गेल्या २ वर्षांपासून एकत्र रहातात. येथील १३ व्या शतकातील सूफी संताचा दर्गा असलेल्या पिरान कलियार येथे नमाजपठणाची अनुमती मागितली होती.
सुनावणीच्या वेळी उच्च न्यायालयाने तिला यामागील कारण विचारले असता ती म्हणाली की, मी इस्लाम स्वीकारलेला नाही किंवा मुसलमानाशी विवाह केलेला नाही. मला ती जागा खूप आवडते आणि याखेरीज अन्य कोणतेही कारण नाही. माझ्यावर कसलाही दबाव नाही किंवा भीतीपोटी मी हे पाऊल उचललेले नाही.
संपादकीय भूमिका
|