१३ टक्के विद्यार्थिनी, तर ७ टक्के विद्यार्थी यांनी केला आहे आत्महत्येचा प्रयत्न !
अॅटलांटा (अमेरिका) – अमेरिकेतील शाळेत वर्ष २०२१ मध्ये प्रत्येक तिसर्या विद्यार्थिनीच्या मनात आत्महत्या करण्याचा विचार येत होता. यात वर्ष २०१९ नंतर बरीच वाढ झाली आहे, असे निरीक्षण ‘यू.एस्. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन’ने (अमेरिकी सरकारच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध यांसाठी कार्यरत संघटनेने) केले आहे.
१. वर्ष २०२१ मध्ये केलेल्या एका सर्वेक्षणानुसार ६० टक्के किशोरवयीन मुलींना व्यथित अथवा दु:खी झाल्यासारखे वाटते. ही संख्या एका दशकात सर्वाधिक होती. ही समस्या कोरोना महामारीमुळे नाही. गेल्या एका दशकात तरुणाईमध्ये नैराश्य वाढले आहे.
२. वर्ष २०२१ मध्ये शाळेतील ३० टक्के विद्यार्थिनींनी सांगितले की, त्यांनी आत्महत्येचा विचार गांभीर्याने केला होता. २४ टक्के विद्यार्थिनींनी आत्महत्येची योजना आखली होती. १३ टक्के विद्यार्थिनींनी आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर त्यांना वैद्यकीय साहाय्य घ्यावे लागले. विद्यार्थ्यांमध्ये हे प्रमाण विद्यार्थिनींच्या तुलनेत काही प्रमाणात अल्प होते.
संपादकीय भूमिका
|