प्रसिद्ध लेखिका प्रा. मधु पूर्णिमा किश्वर यांच्या ‘द गर्ल फ्रॉम कठुआ : अ सॅक्रिफिशियल व्हिक्टिम ऑफ गझवा-ए-हिंद’या पुस्तकाचे केलेले समीक्षण
‘वर्ष २०१८ मध्ये भारताला हादरवून टाकलेल्या घटनेशी संबंधित हे पुस्तक आहे. एका ६ वर्षांच्या मुलीचे १० जानेवारी २०१८ या दिवशी अपहरण करण्यात येऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिला ४ दिवस जम्मूतील एका मंदिरात डांबून ठेवून नंतर ठार मारण्यात आले. या घटनेनंतर १० जून २०१९ या दिवशी विशेष न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ३ आरोपींना आजन्म कारावास, तर अन्य ३ आरोपींना ५ वर्षांचा कारावास आणि प्रत्येकी ५० सहस्र रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. याखेरीज या घटनेमध्ये एक अल्पवयीन मुलगा आरोपी होता. या घटनेनंतर हिंदूंना ‘राक्षसी’ संबोधण्यात आले, ज्याचा परिणाम कित्येक मास टिकून राहिला. यावर प्रकाश टाकणारा लेख…
१. कठुआ प्रकरणातील सत्य शोधण्यासाठी लेखिकेचे कौतुकास्पद प्रयत्न
‘द गर्ल फ्रॉम कठुआ : अ सॅक्रिफिशियल व्हिक्टिम ऑफ गझवा-ए-हिंद’ या पुस्तकामधून मधु पूर्णिमा किश्वर यांनी ‘हिंदूंना छळणे आणि समाजाची धार्मिक मानसिकता पालटणे यांसाठी हिंदूूंविषयीची चुकीची अन् वाईट माहिती प्रसारित करण्याची मोहिम राबवली जात आहे’, असा दावा केला आहे. या पुस्तकामध्ये एप्रिल २०१८ पासून कठुआ प्रकरणाचा अभ्यास करण्यात आला. या प्रकरणी आरोपींवर अनेक त्रुटी असलेले, विचित्र आणि निरर्थक आरोपपत्र प्रविष्ट करण्यात आल्याचे लेखिकेच्या लक्षात आले. तसेच या प्रकरणात पोलिसांनी अनेक निष्पाप हिंदूंचा छळ करून त्यांना खोट्या साक्षी देण्यास भाग पाडले. लेखिकेला या प्रकरणाविषयी माहिती करून घेण्यासाठी जवळजवळ ५ वर्षांचा कालावधी लागला आणि हे प्रकरण जाणून घेतांना पुष्कळ कष्ट झाले, तसेच काही ठिकाणी धोकाही पत्करावा लागला. तरीही किश्वर यांनी अथकपणे या प्रकरणातील विसंगतीचा शोध घेतला. यातून त्यांना सत्तेतील लोकांची निष्ठुरता आणि हातमिळवणी दिसून आली. ‘मेहबूबा मुफ्ती यांनी कशा प्रकारे ‘आय.एस्.आय.’ (पाकिस्तानी गुप्तचर संस्था)च्या सूचनेनुसार या प्रकरणाला वळण देऊन हिंदु आणि भारत देश खलनायक बनतील, असे पाहिले’, हे या पुस्तकातून समोर आले.
२. धर्मांध मुसलमानांची मानसिकता पुस्तकातून उघड करण्याचा प्रयत्न
चालू वर्षात पुढे या पुस्तकाचा दुसरा भाग प्रकाशित झाल्यावर या प्रकरणाविषयी लोकांना अधिक सखोल माहिती मिळेल. आता प्रसिद्ध झालेल्या पुस्तकातून पुष्कळ काही शिकण्यासारखे आहे. विशेषतः भारतीय संस्कृतीवरील वाढत्या संकटांचा उल्लेख आहे. हे पुस्तक जरी एका विशिष्ट घटनेविषयी असले, तरी हिंदूंच्या दृष्टीने ते अधिक महत्त्वाचे आहे. संपूर्ण देशभरात मुसलमानांकडून नियमितपणे शेकडो हिंदु मुलींवर बलात्कार करून त्यांना ठार मारले जाते; परंतु त्याविषयीची बातमी वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानांवर क्वचित्च असते. वर्ष २०१८ मधील या प्रकरणाविषयी मी जेव्हा प्रथमच ऐकले, तेव्हा माझा यावर विश्वासच बसेना. पहिली गोष्ट, म्हणजे सामूहिक बलात्कार करणे आणि तेही एका मंदिरात ? हिंदू असे काही करणार नाहीत. दुसरे म्हणजे गेल्या १ सहस्र ३०० वर्षांत हिंदूंना (त्यांच्या द़ृष्टीने काफिरांना) नष्ट करण्यासाठी सामूहिक बलात्कार करणे, हे धर्मांधांचे धोरण राहिले आहे. त्यांची मानसिकता पालटलेली नाही आणि धर्मांध मुसलमान जगतामध्ये न विसरता ही मानसिकता वापरली जाते. तरीही आम्ही इकडे भावनांविषयी बोलायला नको.
३. हिंदूंनी मुसलमानांकडून धर्माभिमान शिकणे आवश्यक !
या पुस्तकातील प्रकरणातून भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगामध्ये मुसलमान हे धर्माचा अभिमान नसलेल्या हिंदूंना त्यांच्या पायाखाली ठेवण्यासाठी एकत्र येतात, हा सर्वांत महत्त्वाचा धडा आपण घेऊ शकतो. ख्रिस्ती आणि धर्मनिरपेक्ष हिंदू स्वतःला काही लाभ न मिळवता त्यांना पूर्ण अधिकार देतात. वाळवंटातील ही मुसलमान जमात त्यांच्या धर्माशी एवढी एकनिष्ठ आहे की, न्यायालय, पोलीस आणि सनातनी राजकारणी हेही त्यांच्या या मोहिमेमध्ये सकारात्मक प्रतिसाद देतात. ‘मुसलमानांना त्यांच्या धर्माविषयी असलेल्या वचनबद्धतेप्रमाणे हिंदूंनी त्यांच्या धर्माप्रती किमान १ टक्का एकनिष्ठता ठेवावी’, असे मला वाटते. याउलट जिवाशी आले, तरी या सुलेमानी किड्याने बाधित होऊन उच्च नैतिक मूल्ये पाळणे आणि दुसर्यांचा विचार करणे यांकडे बहुतांश हिंदूंचा कल असतो.
४. काश्मीरनंतर जम्मू, लडाख, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश येथून हिंदूंना हुसकावण्याचा प्रयत्न
दुसरे म्हणजे आतापर्यंत जम्मूतील लोकसंख्या जलदपणे पालटत आहे. काश्मीर खोर्यातून हिंदूंना बाहेर काढल्यानंतर ‘जम्मूतील हिंदूंनी भारतामध्ये अन्य ठिकाणी जावे’, अशी त्यांची इच्छा आहे. जम्मूनंतर लडाखची पाळी आहे आणि मग हिंदूंना अरबी समुद्र किंवा बंगालचा उपसागर यांमध्ये उडी मारावी लागेल, इथपर्यंत त्यांचे प्रयत्न वाढत जातील. उत्तराखंड, देवभूमी जम्मू आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये रोहिंगे अन् बांगलादेशातील निर्वासित यांचे थवेच्या थवे येत आहेत आणि या ना त्या प्रकारे ‘गझवा-ए-हिंद’ (इस्लामीस्तान) साध्य करणे, हे त्यांचे एकमेव उद्दिष्ट आहे. त्यांच्या या प्रयत्नांना ‘आय.एस्.आय.’ आणि विदेशी उद्योगपती जॉर्ज सोरोस यांच्याकडून निधी पुरवला जात आहे.
५. इतिहासात आक्रमण करणारे यशस्वी होण्याचे प्रमाण ९५ टक्के !
तिसरे म्हणजे माहितीयुद्धामध्ये हिंदू नेहमीच पराजित होतात. भारत आणि अमेरिका या देशांच्या प्रमुख आस्थापनांमध्ये हिंदु मुख्य कार्यकारी अधिकार्याच्या पदावर असले, तरी त्यात काही तफावत पडत नाही. प्रसारमाध्यमांतील कार्यक्रमासाठी संहिता लिहिण्याखेरीज नवीन युगातील युद्धाविषयी हिंदूंना काहीही माहिती नाही. पूर्वी आम्ही हिंदू युद्धभूमीवर युद्धे हरत होतो आणि आता ‘सायबर’च्या जगात हरत आहोत. यामागचे कारण तेच आहे. युद्धात पहिले आक्रमण करणार्याला नेहमी लाभ होतो; कारण तो युद्धाची वेळ आणि जागा त्याच्या सोयीनुसार निवडतो. स्वरक्षण करणारा केवळ त्याला उत्तर देऊ शकतो. त्यामुळे जगाच्या इतिहासात आक्रमण करणारे यशस्वी होण्याचे प्रमाण ९५ टक्के आहे. या स्थितीला सामोरे जाण्यासाठी आपण स्वतःला सिद्ध केले पाहिजे.
६. पत्रकार राणा अयुब यांचा ‘हम दो हमारे बारह’ या चित्रपटाच्याविज्ञापनावर आक्षेप
पत्रकार राणा अयुब हिने ‘हम दो हमारे बारह’ या चित्रपटाच्या विज्ञापनावर आक्षेप घेत टीका केली. तिने म्हटले, ‘लोकसंख्येच्या स्फोटाविषयी मुसलमानांचे चित्रण समोर ठेवून त्या समाजावर सतत आक्रमण करू पहाणार्या अशा चित्रपटाला परिनिरीक्षण मंडळ (सेन्सॉर बोर्ड) अनुमतीच कशी देते ? मुसलमान कुटुंबाचे चित्र दाखवून ‘हम दो हमारे बारह’ असे म्हणणे, हे केवळ निर्लज्जपणे इस्लामचा तिरस्कार करणारे आहे.’ अशा प्रकारे यावर राणा अयुब यांची ही प्रतिक्रिया आहे.
७. हिंदूंनी मवाळपणा सोडून आक्रमक व्हायला हवे !
दुसरा एक सूक्ष्म संदर्भ या पुस्तकात आहे. तो म्हणजे संघर्ष टाळण्यामध्ये हिंदू सर्वोच्च स्थानी आहेत. लहानपणापासून हिंदूंना स्वाभिमान सोडून संघर्ष टाळण्याची शिकवण दिली जाते. त्यामुळे जगभरातील हिंदूंचा विचार केला, तर तो एक मवाळ समाज आहे, ज्यांना मुसलमान उपाहासाने ‘आळशी’ आणि ‘नामर्द जात’ म्हणून संबोधतात. येथे मी त्यांच्याशी सहमत आहे. सध्या ७५ टक्के, म्हणजे बहुसंख्य असूनही हिंदू हे अत्यंत अडचणीच्या स्थितीत आहेत. असे अल्पसंख्यांकांकडे दया भाकणारे बहुसंख्य जगात अन्य कुठेही नाहीत.
८. मुसलमानांच्या ‘गझवा-ए-हिंंद’च्या निर्मितीमध्ये बहुतांश उच्च पदस्थ हिंदूंचा सहभाग
मुसलमान समाज सर्रासपणे भारतातील न्यायव्यवस्थेमध्ये भ्रष्टाचार आणि त्यांचा प्रचार करत असतो. इच्छा असो किंवा नसो, मुसलमान समाजाने गुन्हेगार आणि आतंकवाद यांच्या रक्षणाची भूमिका बजावली आहे. त्याचा परिणाम न्यायालयाचे बहुतांश निर्णय हिंदूंच्या विरोधी असतात. या मानसिकतेच्या मागे २ कारणे आहेत. एक म्हणजे त्यांना स्वतःच्या संस्कृतीविषयी लाज वाटते. ‘भूतकाळात आपल्या संस्कृतीने काहीही लाभदायक केले नाही’, असे त्यांना वाटते. दुसरे कारण म्हणजे ते दुसर्या देशांकडून विशेषतः पाश्चिमात्य देशांकडून स्तुतीची अपेक्षा ठेवतात. मागे वर्ष २०१६ मध्ये माझ्या एका मुसलमान मित्राने ‘आम्हाला केवळ सर्वोच्च न्यायालयच वाचवू शकते’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्या वेळी ‘आम्ही’, म्हणजे ‘मध्यमवर्गीय माणसे’, असे त्याला म्हणायचे असावे, असे मला वाटले; परंतु त्यानंतर काही मासांनी मला कळले की, तो मुसलमान समाजाविषयी तसे म्हणत होता.
या पुस्तकाच्या शेवटी जोडलेल्या सूचीमध्ये ज्या लोकांनी इस्लामवाद्यांना या भयंकर प्रयत्नामध्ये साहाय्य केले आहे, ते वाचून श्वास रोखला जातो. त्यांना साहाय्य करणारे राज्यपाल, पंतप्रधान कार्यालयातील कर्मचारी, पोलीस अधिकारी ते न्यायाधीश हे सर्वजण बहुतांश हिंदू आहेत. काही तर कट्टर सनातनी असूनही त्यांनी या ना त्या प्रकारे कोणत्याही लाभाची इच्छा न बाळगता हिंदु धर्माविषयी वाईट प्रचार करण्यासाठी साहाय्य केले आहे. या मागची कारणे त्वरित शोधली पाहिजेत. निधर्मीवादाच्या विळख्यात हिंदु धर्म कमकुवत होत असतांना हे हिंदू बदकाप्रमाणे स्वस्थ का बसले आहेत ? ‘मुसलमान ‘गझवा-ए-हिंद’ची कार्यवाही करण्यासाठी कोणतेही मूल्य देऊन प्रयत्न करत असतांना त्या कटकारस्थानात सहभागी होण्यास हिंदू का उत्सुक असतात ?’, असा प्रश्न लेखिकेने या पुस्तकामध्ये विचारला आहे.
९. छायाचित्रे आणि तक्ते यांमुळे पुस्तक अधिक वाचनीय !
लेखिकेने पुस्तकाच्या ‘टॅ्रजिक कॉन्सिक्वन्सेस ऑफ हिंदू धिमीट्यूड’ या शेवटच्या प्रकरणामध्ये हिंदु सभ्यतेवरील आलेल्या संकटांविषयी सांगितले आहे. या प्रकरणात समर्पक असे प्रश्न उपस्थित केले आहेत, ज्यांची उत्तरे हिंदु नेत्यांना शोधावी लागतील. ‘सत्ता केवळ विकासासाठी मिळालेली नाही, तर संस्कृतीमधील विकृती सुधारण्यासाठी मिळालेली आहे’, हे सरकारच्या लक्षात आले पाहिजे. या पुस्तकातील भाषा अगदी सोपी, घटनांवर आधारित आणि कट्टर राष्ट्रवादी नाही. या पुस्तकातील आशय समजण्यास सोपा व्हावा; म्हणून त्यांनी केलेल्या संशोधनाला धरून स्क्रीनशॉट (संगणकीय छायाचित्रे), नकाशे आणि तक्ते घेण्यात आले आहेत. या पुस्तकाची बांधणी चांगली असून कागद चांगल्या प्रतीचा आहे. त्यामुळे ते वाचनीय आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर एखाद्याचे रक्त सळसळू लागेल (अर्थात् रक्त योग्य त्या दिशेने वहात असेल तर).
तसेच या पुस्तकात एक उणीव भासली, ती म्हणजे पुस्तकाचे वजन १ किलोहून अधिक आहे. या पुस्तकाला ६४२ पाने असून त्याची मूळ किंमत ७९९ रुपये (सवलत देऊन किंमत ६४९ रुपये) आहे. त्यामुळे हे पुस्तक या प्रकरणाविषयी ज्या सर्वसामान्य लोकांना कळायला हवे, त्यांच्यापर्यंत पोचू शकणार नाही. या पुस्तकातील अक्षरांचा आकार थोडा मोठा आहे. तो थोडा न्यून केल्यास १०० पाने न्यून होऊ शकतील आणि ते घेणार्यांच्या दृष्टीने अजून सुटसुटीत होईल. कठुआ प्रकरणाचा चेंडू आता न्यायालय आणि राजकारणी यांच्या मैदानात आहे. त्यांनी याची नोंद घेऊन काहीही चूक नसतांना कारागृहात सडत पडलेल्या ७ जणांच्या मानवी अधिकारावर विचार करून याविषयी अचूक संशोधन करावे. तोपर्यंत ‘गंगा जमुनी तहजीब झिंदाबाद !’ (गंगा-जमुनी तहजीब म्हणजे गंगा आणि यमुना या नद्यांच्या तिरांवर वास्तव्य करणार्या हिंदू अन् मुसलमान यांच्यातील कथित ऐक्य दर्शवणारी संस्कृती !)
* लेखक : श्री. अमित अगरवाल, नवी देहली. (१६.४.२०२३)
(श्री. अमित अगरवाल हे ‘स्विफ्ट हॉर्सिस शार्प स्वॉर्ड्स’ आणि ‘अ नेव्हर ऐंडिंग कॉनफ्लिक्ट’ या पुस्तकांचे लेखक आहेत.)
संपादकीय भूमिकानिधर्मीवादाच्या विळख्यात हिंदु धर्म कमकुवत होत असतांना हिंदूंनी बदकाप्रमाणे स्वस्थ बसण्याऐवजी संघटित होणे आवश्यक ! |