पाटलीपुत्र (बिहार) येथे मद्य माफियांनी पोलिसांवर आक्रमण करून मद्य तस्कराची केली सुटका

३ पोलीस घायाळ

पटना (बिहार) – येथे मद्य माफियांनी पोलिसांच्या वाहनावर आक्रमण करून त्यांच्या कह्यातून मद्य तस्कराची सुटका केली. पोलिसांनी या वेळी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केल्यावर माफियांनी पोलिसांवर दगडपेक करून त्यांच्या वाहनाची तोडफोड केली. या घटनेत ३ पोलीस घायाळ झाले. यानंतर पोलिसांनी एका गावामध्ये धाड टाकून ६ जणांना कह्यात घेतले. यात २ महिलांचा समावेश आहे.

संपादकीय भूमिका 

बिहारमध्ये जंगलराज !