१. आपत्काळापूर्वी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले संकलित ग्रंथांचे समाजाच्या दृष्टीने योगदान !
अ. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले संकलित करत असलेल्या ग्रंथांतील ज्ञानाने समाज सात्त्विक (साधक) होऊन तो हिंदु राष्ट्रासाठी पोषक होणार आहे. यातूनच हिंदु राष्ट्राची जडणघडण होणार आहे.
आ. आपण साधना केली, तरच भीषण आपत्काळात वाचू शकतो; कारण साधकांवर देवाची कृपा असते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले संकलित करत असलेल्या ग्रंथांतून सुयोग्य, सध्याच्या वैज्ञानिक युगातील पिढीला सहज पटेल असे वैज्ञानिक परिभाषेत आणि काळानुसार आवश्यक अशा साधनेचे ज्ञान मिळते.
इ. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर विविधांगी विषयांवरील ग्रंथ संकलित करत असल्याने त्या माध्यमातून अनेक जण आपापली प्रकृती आणि आवड यांनुसार साधनेकडे लवकर वळू शकतात.
ई. हिंदु राष्ट्र हे काही सहस्र वर्षे टिकेल; परंतु ग्रंथांतील ज्ञान अनंत काळ टिकणारे असल्याने जसे हिंदु राष्ट्र लवकर येणे आवश्यक आहे, तितकीच घाई आपत्काळ आणि तिसरे महायुद्ध चालू होण्यापूर्वी हे ग्रंथ प्रकाशित करण्याचीही आहे.
२. ११४ विषयांवरील ग्रंथमालिकांच्या अंतर्गत ५ सहस्रांहून अधिक ग्रंथ प्रसिद्ध होण्याच्या कार्यात सहभागी व्हा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर संकलन करत असलेल्या ग्रंथांपैकी फेब्रुवारी १९९५ पासून मार्च २०२३ पर्यंत ३६० ग्रंथांच्या मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, कन्नड, तमिळ, तेलुगु, मल्ल्याळम्, बंगाली, ओडिया, आसामी, गुरुमुखी, सर्बियन, जर्मन, स्पॅनिश, फ्रेंच आणि नेपाळी या १७ भाषांत ९३ लाख प्रती प्रकाशित झाल्या आहेत. सर्वसाधारणपणे १०० पृष्ठांचा (५०० केबीचा) एक ग्रंथ आहे.
सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर संकलित मनुष्य, साधना, कला, समाज, राष्ट्र, विश्व, अध्यात्म, धर्म आदी विषयांवरील ग्रंथमालिका आहेत. त्याचप्रमाणे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची जीवनगाथा, त्यांचे कार्य आणि उत्तराधिकारी यांच्याशी संबंधित एकूण ११४ विषयांवरील ग्रंथमालिकाही आहेत. त्या अंतर्गत अनुमाने ५ सहस्रांहून अधिक ग्रंथांच्या निर्मितीची प्रक्रिया चालू आहे.
वरील विषयांवरील ग्रंथमालिका अधिक वेगाने होण्यासाठी अनेकांच्या साहाय्याची आवश्यकता आहे. आपली आवड आणि क्षमता यांनुसार ग्रंथनिर्मितीच्या सेवेत सहभागी होऊन या सुवर्णसंधीचा अधिकाधिक लाभ करून घ्या !
– (पू.) संदीप आळशी, सनातनच्या ग्रंथांचे संकलक
३. पुढीलपैकी कोणत्याही सेवेत सहभागी होण्यासाठी संपर्क करा !
३ अ. ग्रंथनिमिर्तीशी संबंधित सेवा
१. संगणकीय लिखाणाचे संकलन; संस्कृत श्लोक आदी पडताळणे; तसेच ग्रंथांचे अंतिम संकलन करणे
२. ग्रंथांची संरचना करणे आणि सारण्या (टेबल) बनवणे
३. मराठी, हिंदी किंवा इंग्रजी ग्रंथ देशी-विदेशी भाषांत अनुवादित करणे
वरील सेवांसाठी संगणकाचे जुजबी ज्ञान असणे, तसेच संगणकीय टंकलेखन करता येणे आवश्यक आहे. इच्छुकांना या सेवांची आवड असल्यास; परंतु या सेवांचा अनुभव नसल्यास ते काही दिवस सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात राहून या सेवा शिकून घेऊ शकतात. पुढे त्यांना सनातनच्या आश्रमात राहून किंवा घरी राहूनही सेवा करता येतील.
३ आ. मुद्रणासंबंधी सेवा
१. ऑफसेट प्रिंटींग, मल्टीकलर प्रिंटींग, सिंगल कलर प्रिंटींग इत्यादी सेवा
२. मुद्रणासंबंधी अहवाल भरणे यासारख्या संगणकीय सेवा करण्यासाठी ओपन ऑफीस, एक्सेल, कोरल ड्रॉ, इनडिझाईन, ई-मेल आदींचे जुजबी संगणकीय ज्ञान असावे.
३. ग्रंथांचे मुद्रण योग्य प्रकारे झाल्याची पडताळणी करणे यासारख्या सेवा एका ठिकाणी बसून करणे
४. ग्रंथांच्या खोक्यांची ने-आण करणे यासारख्या शारीरिक क्षमतेच्या सेवा करणे
४. दुचाकी किंवा चारचाकी वाहन चालवणे
वर दिलेल्या सेवा करण्याची क्षमता असणार्यांना वरीलप्रमाणे जुजबी ज्ञान नसेल; पण त्या त्या सेवा शिकण्याची आवड असेल, तर अशांनाही संबंधित सेवा शिकवता येतील.
५. सेवा करू इच्छिणार्यांनी कळवायची माहिती
या सेवा करू इच्छिणार्यांनी वरील सारणीनुसार आपली माहिती सनातनच्या साधकांना संगणकीय धारिकेच्या किंवा लिखित स्वरूपात द्यावी आणि साधकांनी ती माहिती आपल्या जिल्हासेवकांच्या माध्यमातून सौ. भाग्यश्री सावंत यांच्या नावे [email protected] या संगणकीय पत्त्यावर अथवा पुढील टपाल पत्त्यावर पाठवावी.
टपालासाठी पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, रामनाथी, फोंडा, गोवा. पिन ४०३ ४०१.