पाकचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो भारतात येणार !

गोव्यातील शांघाय सहयोग संघटनेच्या बैठकीसाठी उपस्थित रहाणार !  

पाकचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो

इस्लामाबाद (पाकिस्तान) – गोव्यात होणार्‍या शांघाय सहयोग संघटनेच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होणार्‍या पाकच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व पाकचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी हे करणार आहेत, अशी माहिती पाकच्या परराष्ट्र कार्यालयाने दिली. त्यामुळे वर्ष २०१४ नंतर पाकच्या एखाद्या प्रमुख नेत्याची ही पहिलीच भारतात भेट असणार आहे. वर्ष २०१४ मध्ये पाकचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ पंतप्रधान मोदी यांच्या शपथविधीसाठी देहलीमध्ये आले होते.