१. डॉ. शर्वरी शिरीष यरगट्टीकर (कै. बेडेकर यांची भाची, बहिणीची मुलगी), फिजिओथेरपिस्ट, निगडी, पुणे.
१ अ. ‘माझे मामा ‘साधी राहणी आणि उच्च विचारसरणी’, या वृत्तीचे होते.
१ आ. ते हसतमुख होते.
१ इ. निसर्गप्रेमी असणे आणि वन अधिकारी म्हणून कौशल्याने कार्य करणे : ते वन अधिकारी होते. एकदा त्यांनी जंगलातील एका मोकाट सुटलेल्या वाघाला जायबंदी केले. तेव्हा मला त्यांचा अभिमान वाटला. पन्हाळा (जिल्हा कोल्हापूर) येथे त्यांच्या नेतृत्वाखाली सर्पोद्यान चालू झाले. तेथे वेगवेगळ्या प्रकारचे साप आणि नाग यांचे संरक्षण अन् संवर्धन केले जात असे. मामांनी ‘सामाजिक वनीकरण, शहरातील झाडे-झुडपे आणि त्यांचे सुशोभीकरण’, यांचा सखोल अभ्यास केला होता. त्यांनी ‘झाडाझुडपांची रंगसंगती, त्यांचे संगोपन, लागवड, कलम करणे’, यांविषयी नवीन प्रयोग आणि अभ्यास केला. ते निसर्गप्रेमी होते.
१ ई. ते इतरांना साहाय्य करत असत.
१ उ. शेवटपर्यंत गुरुभक्ती आणि सेवा करणे : ते नेहमी स्वतःला कामात गुंतवून ठेवत असत. सनातनच्या कार्यात त्यांचे मन रमले होते. त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत गुरुभक्ती आणि आनंदाने सेवा केली. हीच त्यांच्यावरील खरी गुरुकृपा आहे.
‘ईश्वर मामास सद़्गती देवो’, हीच इच्छा !’
२. सौ. नीलांबरी नीलकंठ गानू (मेहुणी), संभाजीनगर
अ. ‘ते योगासने, व्यायाम आणि सात्त्विक आहार-विहार करत होते.
आ. शांत, निगर्वी, हुशार आणि मितभाषी स्वभावामुळे ते सगळ्यांचे लाडके होते.
इ. त्यांचा संसार सुखाचा झाला. आता ते निवृत्तीचा आनंद घेत होते. त्यांचे सनातन संस्थेचे कार्य समाधानाने चालू होते. ते हसतमुखाने आमचे आणि सर्व नातेवाइकांचे स्वागत करत असत. आता जरा समाधानाने आयुष्य जगायचे, तर या दुःखद बातमीने कानावर विश्वास बसत नव्हता. ‘का आणि कसे ?’, याला उत्तर नाही. परमेश्वराच्या इच्छेपुढे मनुष्य हतबल आहे.’
३. डॉ. सुषमा गोरे (मेहुणी), निगडी, पुणे.
अ. ‘मोहनराव तेजस्वी, कायम हसतमुख, उच्च पदावर कार्यरत असूनही निगर्वी आणि साधी रहाणी असलेले होते.
आ. त्यांचे जाणे मनाला चटका लावून गेले.
इ. ते संत माणूस होते.’
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : १२.४.२०२३)