‘श्रीमती सुनीता देवकाकूंच्या समवेत सेवा करतांना पुणे येथील साधिकांना काकूंची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. सौ. राधा सोनवणे
१ अ. सेवेची तळमळ : ‘काकूंनी त्यांच्या आजूबाजूच्या परिसरात फलकलेखन (फलकावर धर्मशिक्षणाविषयी लिखाण करणे) ही सेवा केली आहे. त्यांनी फलकावर लिहिण्यात येणार्या लिखाणाच्या नातवाकडून छापील प्रती (प्रिंट) काढून घेतल्या आणि त्यांनी त्यांचे परिचित रहात असलेल्या ठिकाणच्या सूचनांच्या फलकांवर त्या छापील प्रती लावल्या.
१ आ. परिस्थिती स्वीकारणे : काकूंची कोरोना चाचणी सकारात्मक आली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात भरती व्हावे लागले. त्या प्रसंगातही काकू स्थिर होत्या.
१ इ. कृतज्ञताभाव : आता वयोमानामुळे त्यांना बाहेर पडून सेवा करायला जमत नाही; परंतु त्या ‘ऑनलाईन’ सत्संगाला नियमित जोडलेल्या असतात. ज्या वेळी त्यांना सत्संगाला जोडायला जमत नाही, त्या वेळी त्या लघुसंदेश करून अडचण कळवतात. घरी राहून ‘ऑनलाईन’च्या माध्यमातून सत्संग मिळतो, याबद्दल त्यांच्या मनात पुष्कळ कृतज्ञताभाव आहे.’
२. डॉ. (सौ.) चारुलता पानघाटे (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ५७ वर्षे)
२ अ. सेवेची तळमळ : ‘काकूंची प्रकृती ठीक नसतांना त्यांना जिना चढणे, उतरणे आणि शारीरिक श्रमाची कामे करणे जमत नव्हते. तेव्हा त्या ‘घरी राहून भ्रमणभाषवर सेवा करू शकते का ?’, असे मला विचारत असत.
२ आ. परिपूर्ण सेवा करणे : त्या वेळी काकूंना भ्रमणभाषवर करता येणार्या एका सेवेचे दायित्व दिले. त्यांनी ती सेवा उत्तम केली. त्या सेवेचा आढावाही वेळेवर देत असत.
२ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रती भाव आणि श्रद्धा : त्या पूर्वी रहात असलेल्या ठिकाणी प्रतिदिन फलकलेखन करत. तेव्हा त्या ‘गुरुमाऊलीच (परात्पर गुरु डॉ. आठवले) माझ्या समवेत आहेत’, असा भाव ठेवत असत. त्यांची गुरुदेवांवर दृढ श्रद्धा आहे.’
३. सौ. अश्विनी ब्रह्मे (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ६४ वर्षे)
३ अ. सेवेची तीव्र तळमळ
१. ‘काकूंचे वय अधिक असून त्यांना शारीरिक त्रासही आहेत. काकू हे सर्व स्वीकारून ‘भित्तीपत्रके लावणे, फलकलेखन करणे, ग्रंथप्रदर्शन लावणे’, अशा समष्टी सेवा तळमळीने करतात.
२. काकू हिंदु राष्ट्र-जागृती सभा आणि गुरुपौर्णिमा असतांना पुष्कळ तळमळीने जिज्ञासूंना निमंत्रण देतात.
३ आ. स्वतःला पालटण्याची तळमळ : मी त्यांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेत होते. त्या आढाव्यात प्रामाणिकपणे साधनेचे प्रयत्न सांगत असत.
३ इ. त्यांच्याकडून ‘परिस्थिती स्वीकारणे, कृतज्ञताभाव आणि परात्पर गुरु डॉक्टरांप्रती भाव’, हे गुण मला शिकायला मिळाले.’
४. सौ. संगीता जागडे (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ४७ वर्षे)
४ अ. प्रेमभाव : ‘देवकाकू सर्वांची प्रेमाने विचारपूस करतात.
४ आ. सेवेची तळमळ : काकू आणि मी सेवेला जात होतो. तेव्हा आम्हाला पुष्कळ अंतर चालावे लागायचे; परंतु काकूंचे त्याबद्दल कोणतेही गार्हाणे नसे. त्यांच्यात सेवेची तळमळ अधिक आहे.
४ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव : काकूंच्या जीवनात अनेक कठीण प्रसंग आले, तरीही त्या सकारात्मक आहेत. त्यांचा ‘गुरुदेवच सर्व प्रसंगातून बाहेर काढत आहेत’, असा भाव आहे.’
५. श्रीमती शीतल नेर्लेकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ५३ वर्षे)
५ अ. इतरांना समजून घेणे : ‘त्या त्यांच्या सुनांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतात.
५ आ. कठीण प्रसंगात स्थिर रहाणे : काकूंच्या मुलाचे ५ वेळा अंतर्गळाचे शस्त्रकर्म झाले. (‘पोटातील आतड्यासारख्या अवयवाचा काही भाग त्वचा आणि स्नायू यांच्या मधल्या भागात पोटाच्या स्नायूंच्या भिंतींमधून बाहेर येणे’, याला ‘अंतर्गळ’ किंवा इंग्रजीत ‘हर्निया’ म्हणतात.) त्या वेळी काकू स्थिर होत्या. काकूंची ‘अँजिओप्लास्टी’ (‘अँजिओप्लास्टी’ म्हणजे ‘हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधील अडथळा दूर करण्यासाठी केले जाणारे एक प्रकारचे शस्त्रकर्म’) झाली आहे. त्या वेळी काकू पुष्कळ स्थिर होत्या. त्या वेळी काकूंचा ‘प.पू. गुरुमाऊली सदैव समवेत आहेत’, असा भाव होता.
५ इ. त्यांच्या मनात प.पू. गुरुदेवांच्या प्रती पुष्कळ कृतज्ञताभाव आहे.’
६. सौ. मंगला सहस्रबुद्धे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ६८ वर्षे)
६ अ. नम्रता : ‘काकू नेहमी हळू आवाजात आणि नम्रतेने बोलतात.
६ आ. परिस्थिती स्वीकारणे : काकूंनी यजमानांच्या निधनानंतर दोन्ही मुलांना अत्यंत कष्टाने लहानाचे मोठे केले. संसाराचे सर्व दायित्व पार पाडले. त्यांच्यामधील प्रतिकूल परिस्थितीतही सेवा करण्याची तळमळ खरोखरच कौतुकास्पद आहे. त्यांनी सर्व प्रसंग संघर्ष करून स्वीकारले.
६ इ. सेवेची तळमळ : काकू हिंदु राष्ट्र-जागृती सभा आणि गुरुपौर्णिमा यांच्या प्रसारासाठी दूर अंतरापर्यंत चालत जाऊन तळमळीने प्रसार करतात. त्यांना काही वर्षे आश्रमात राहून सेवा करण्याची संधी मिळाली आहे.
६ ई. त्यांचे आयुष्य जरी खडतर गेले असले, तरीही त्यांची प.पू. गुरुदेवांवर (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर) नितांत श्रद्धा आहे.’
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक १५.११.२०२२)