हिंदूंनी हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी केलेले प्रयत्न अराष्ट्रीय नाहीत !

स्वातंत्र्यपूर्व काळात हिंदुस्थान सरकारच्या मंत्रीमंडळात असलेल्या ‘सर’ फजली हुसेन यांनी उत्तर हिंदुस्थानातील मुसलमानांत गुप्त पत्रक मोठ्या प्रमाणावर प्रसृत केले होते. त्यात म्हटले होते, ‘‘सांभाळा ! या हिंदु-मुसलमानांच्या एकीच्या जाळ्यात सापडू नका ! आपणाला भिकारड्या हिंदूंशी एकी करून काय लाभ ? आपण इंग्रजांशी एकी करून आपला लाभ करून घेतला पाहिजे.’’ त्यामुळेच हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्या रक्षणाकरता हिंदुस्थानातील हिंदूंनी केलेले प्रयत्न हे जातीय आणि अराष्ट्रीय असूच शकत नाहीत.

(साभार : ‘लोकजागर’, १२ एप्रिल २०१३)