(म्हणे) ‘रामनवमीच्या मिरवणुकांच्या वेळी मुसलमानबहुल भागात आक्रमण कराल, तर कारवाई करीन !’ – ममता बॅनर्जी

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची हिंदूंना चेतावणी !

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

नवी देहली –  एक गुंड म्हणतो, ‘रामनवमीच्या दिवशी जे शस्त्र हातात मिळेल, ते घेऊन बाहेर पडेन.’ मीही पहाते कोण काय करतो ते ? तुमच्याकडे जे कोणते शस्त्र आहे, ते घ्या. मी रामनवमीची मिरवणूक रोखणार नाही; मात्र लक्षात ठेवा, आम्हीही संचालन करू. रमझानचा मास चालू आहे. जर तुम्ही मुसलमानांच्या भागात जाऊन आक्रमण कराल, तर तुमच्यावर कारवाई केली जाईल, अशी चेतावणी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रामनवमीच्या मिरवणुकांच्या पार्श्‍वभूमीवर दिली. बंगालमध्ये हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून मोठ्या संख्येने रामनवमीच्या निमित्त मिरवणुका काढण्यात येणार आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी ही चेतावणी दिली.

सौजन्य : Zee News

‘मिरवणुका काढणे, सभा घेणे हा सर्वांचा अधिकार आहे; मात्र त्या वेळी गोंधळ घालण्याचा कुणालाही अधिकार नाही. रामनवमीची पूजा शांततेच करा; मात्र रमझानचा मास चालू आहे, त्याचे पालन करा’, असेही आवाहन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले.

संपादकीय भूमिका

  • हिंदूंच्या धार्मिक मिरवणुका मुसलमानांच्या भागातून नेण्यास पोलीस आधीच अनुमती देत नाहीत. त्यातही मिरवणुका तेथून गेल्या की, मुसलमान वाद्य वाजवण्यास मनाई करतात आणि मग ते नाकारल्यावर मशिदींवरून, घरांच्या छतांवरून हिंदूंवर दगडफेक करतात. ही वस्तूस्थिती असतांना बंगालच्या मुख्यमंत्री हिंदूंनाच दोषी ठरवून त्यांना धमकी देतात, हे संतापजनक होय !
  • सातत्याने धर्मांधांना पाठीशी घालून हिंदूंना वार्‍यावर सोडणार्‍या मुख्यमंत्री बंगालमधील हिंदूंना लाभणे, हे हिंदूंचे दुर्दैव होय. हे रोखण्यासाठी हिंदूंनी तृणमूल काँग्रेसचे राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !