कुपवाड (जिल्हा सांगली) येथील अनधिकृत प्रार्थनास्थळाचे बांधकाम हटवण्यास महापालिकेकडून प्रारंभ !

प्रार्थनास्थळाच्या भूमीवर आहे शाळेचे आरक्षण !

सांगली – कुपवाड येथील मंगलमूर्ती वसाहत येथे अनधिकृत प्रार्थनास्थळाचे बांधकाम चालू असल्याची माहिती सांगली महापालिका प्रशासनास समजली. यानंतर नगररचना विभागाने पहाणी करून या संदर्भातील अहवाल आयुक्तांकडे सादर केला. या ठिकाणी प्राथमिक शाळेचे आरक्षण असल्याने महापालिका हे बांधकाम हटवेल, असे प्रशासनाने सांगितले. यानंतर सायंकाळी ६ वाजेनंतर हे बांधकाम हटवण्यास प्रारंभ करण्यात आला.

विशेष म्हणजे हे सूत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांनी मुंबईतील गुढीपाडव्याच्या सभेत उपस्थित केले होते. यानंतर दुसर्‍याच दिवशी हालचाल करत महापालिका प्रशासनाने पहाणी केली.