जलवायू परिवर्तनामुळे भारतात धान्याच्या उत्पादनात घट होऊ शकते !  

संयुक्त राष्ट्राच्या तज्ञांच्या गटाचा अहवाल !

नवी देहली – संयुक्त राष्ट्रांच्या तज्ञांच्या एका गटाने चेतावणी दिली आहे की, जर जलवायू परिवर्तनावर नियंत्रण मिळवले नाही, तर भारतातील धान्य उत्पादनात पुष्कळ घट होऊ शकते.

१. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस म्हणाले की, जी-२० देशांकडून जलवायू परिवर्तनाला १.५ डिग्री सेंटीग्रेड न्यून करण्यासाठी करार करण्याचा आग्रह केला जात आहे. या संदर्भात तज्ञांच्या एका अहवालात म्हटले आहे की, तापमानात १ ते ४ डिग्री सेंटीग्रेड पर्यंत वृद्धी झाली, तर भारतात तांदळाच्या उत्पादन १० ते ३० टक्के घट होऊ शकते, तसेच मक्याचे उत्पादन २५ ते ७० टक्के घटू शकते.

२. संयुक्त राष्ट्रांच्या तज्ञांच्या अहवालानुसार जलवायू परिवर्तनामुळे भारतातील समुद्रकिनारी असलेल्या शहरातील साडेचार ते पाच कोटी नागरिकांना धोका आहे. यात मुंबई, चेन्नई, तसेच गोव्याचा समावेश आहे. ही शहरे पाण्याखाली जाऊ शकतात. जलवायू परिवर्तनामुळे समुद्राच्या पाण्याचा स्तर वाढत आहे.